जीएम वांग्याच्या बियाण्यांची चाेरट्या मार्गाने घुसखाेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:06 AM2021-06-17T04:06:56+5:302021-06-17T04:06:56+5:30
नागपूर : जनुकीय परिवर्तित (जीएम) वांगी बियाण्यांच्या लागवडीला सध्यातरी महाराष्ट्रात परवानगी नाही. मात्र तरीही जीएम वांग्याचा सर्रासपणे प्रसार केला ...
नागपूर : जनुकीय परिवर्तित (जीएम) वांगी बियाण्यांच्या लागवडीला सध्यातरी महाराष्ट्रात परवानगी नाही. मात्र तरीही जीएम वांग्याचा सर्रासपणे प्रसार केला जात आहे. अशाच मार्गाने कापसाच्या जीएम बियाण्यांचा प्रसार केल्यानंतर आता वांग्याच्या जीएम बियाण्यांची चाेरट्या मार्गाने घुसखाेरी केली जात असल्याचे आराेप बीजाेत्सव संस्थेने केला आहे. या बियाण्यांमुळे भविष्यात पर्यावरणावरील संभाव्य धाेके लक्षात घेत जीएम वांग्याच्या बियाण्यांवर कठाेर निर्बंध घालण्याच्या मागणीचे निवेदन राज्यातील ७० पर्यावरणस्नेही संस्थांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जीएम बियाणे चाेरट्या मार्गाने शेतकऱ्यांपर्यंत पाेहचविणाऱ्यांना पकडण्यात आले हाेते. काेराेना आपत्तीचा फायदा घेत बांगलादेश व इतर देशांमधून भारतात आणून महाराष्ट्रासह इतर राज्यात तस्करी केली जाते. बीजाेत्सवच्या सदस्या व वनस्पती अभ्यासक प्राची माहूरकर यांनी सांगितले, राज्यातील काही माेठे व्यापारी गट या जीएम बियाण्यांच्या प्रसारात अग्रेसर आहेत. भरघाेस उत्पादनाचे आमिष दाखवून किंवा गावातील प्रतिष्ठित मंडळीकडून दबाव आणून शेतकऱ्यांना या वांग्याची लागवड करण्यास भाग पाडले जात आहे. बियाण्यांच्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती नसल्याने शेतकरी याला बळी पडत असल्याचे माहूरकर यांनी सांगितले. शिवाय या बियाण्यांची खरेदी करताना पावती मिळत नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक हाेण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
देशात ९५० देसी वांग्यांच्या प्रजाती
आपल्या देशात ९५० च्यावर वांग्याच्या नाेंदणीकृत प्रजाती आहेत. उल्लेखनीय म्हणजे प्रत्येक हवामानानुसार हाेणाऱ्या आहेत. त्यामुळे चवीचेही वैविध्य राखले गेले आहे. जीएम बियाणे आले तर देसी बियाणे नष्ट हाेईल व चवीचे वैविध्य संपेल, अशी भीती माहूरकर यांनी व्यक्त केली.
संस्थांनी केलेल्या मागण्या
- बेकायदेशीर बियाण्यांचा तपास आणि त्याचा पुरवठा थांबविणे.
- शेतकऱ्यांना सरकारी खात्यात अवैध बियाणे जमा करण्यास प्राेत्साहित करणे.
- जीएम बियाण्यांची त्वरीत चाचणी करण्याची व्यवस्था करणे.
- जीएम बियाण्यांच्या धाेक्याबद्दल जाहीर जागृती कार्यक्रम राबविणे.
- सेंद्रीय व नैसर्गिक शेती व बियाण्यांना प्राेत्साहित करणे.