शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सांभाळण्यासाठी पुढे या! महापौरांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:19 AM2019-01-02T00:19:58+5:302019-01-02T00:21:41+5:30

स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये आपल्या नागपूर शहराने सहभाग घेतला आहे. आपले शहर स्वच्छ, सुंदर व्हावे, कचऱ्याचे योग्य विलगीकरण यासाठी महापालिकेतर्फे जनजागृती केली जात आहे. या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी होऊन आपल्या शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सांभाळण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले आहे.

Go ahead to take charge of the city's cleanliness! Mayor Appeal | शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सांभाळण्यासाठी पुढे या! महापौरांचे आवाहन

शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सांभाळण्यासाठी पुढे या! महापौरांचे आवाहन

Next
ठळक मुद्देग्रीन व्हिजीलच्या सदस्यांना स्वच्छता मित्रचे ओळखपत्र प्रदान

लोकमत न्यूज नेवटर्क
नागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये आपल्या नागपूर शहराने सहभाग घेतला आहे. आपले शहर स्वच्छ, सुंदर व्हावे, कचऱ्याचे योग्य विलगीकरण यासाठी महापालिकेतर्फे जनजागृती केली जात आहे. या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी होऊन आपल्या शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सांभाळण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले आहे.
स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. याला प्रतिसाद देत शहरातील ग्रीन व्हिजीलच्या सदस्यांनी स्वच्छता मित्र बनण्यात पुढाकार घेतला. महापौरांनी ग्रीन व्हिजीलचे सुरभी जायस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, बिष्णूदेव यादव यांना स्वच्छता मित्र ओळखपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९चे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर व ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी, स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार उपस्थित होते.
यावेळी महापौरांनी सर्व स्वच्छता मित्रांचे कौतुक करून ग्रीन व्हिजीलप्रमाणेच नागपूर शहरातील प्रत्येक जबाबदार नागरिकांनी स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले.

Web Title: Go ahead to take charge of the city's cleanliness! Mayor Appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.