नागपुरात गो एअरच्या विमानात बिघाड, दिल्ली विमान रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 11:50 PM2020-01-06T23:50:39+5:302020-01-06T23:51:21+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसऱ्या दिवशीही गो एअरचे विमान दुरुस्त झाले नाही. त्यामुळे सोमवारी जी ८-२५२० नागपूर दिल्ली विमान रद्द करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसऱ्या दिवशीही गो एअरचे विमान दुरुस्त झाले नाही. त्यामुळे सोमवारी जी ८-२५२० नागपूर दिल्ली विमान रद्द करण्यात आले.
रविवारी रात्री या विमानात बिघाड झाल्यामुळे बंगळुरूवरून आलेल्या विमानात दिल्लीच्या प्रवाशांना पाठविण्यात आले. परंतु हे विमान दिल्लीतच अडकले. नागपुरात आधीच नादुरुस्त झालेल्या विमानाला रविवारी सकाळी ६ ऐवजी ९.३० वाजता बंगळुरूला रवाना करण्यात येणार होते. परंतु विमान सकाळी ११ वाजता रन वे पर्यंतच पोहोचू शकले. त्यानंतर अहमदाबादवरून पोहोचलेल्या विमानातून प्रवाशांना बंगळुरूला पाठविण्यात आले. एक विमान नादुरुस्त असल्यामुळे विमानांचे वेळापत्रक विस्कळीत होत आहे. याशिवाय सोमवारी गो एअरचे नागपूर-पुणे विमानही रात्री उशिरापर्यंत रवाना झाले नव्हते. फ्लाईट जी ८-२८४ नागपूर-पुणेच्या प्रस्थानाची वेळ रात्री १२.१५ वाजता सांगण्यात आली. जी ८-१४२ मुंबई-नागपूर हे विमान उशिरा आल्यामुळे नागपूर-पुणे विमानाला उशीर झाला.
धुक्यामुळे सहा विमानांना उशीर
कडाक्याची थंडी आणि दाट धुके पडल्यामुळे विमान सेवेवर त्याचा परिणाम झाला आहे. सोमवारी खराब वातावरणामुळे सहा विमानांना उशीर झाला. सोमवारी उशीर झालेल्या विमानात जी ८-६१५ दिल्ली-नागपूर १.२१ तास, जी ८-७३१ अहमदाबाद-नागपूर १.१० तास, ६ ई ५३८८ मुंबई-नागपूर ४१ मिनिट, ६ ई ४०३ मुंबई-नागपूर ५५ मिनिट, ६ ई २०२ पुणे-कोलकाता ४९ मिनिट आणि जी ८-१४२ मुंबई-नागपूर २.२० तास उशिराने पोहोचले. विमानांना विलंब झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.