गोवा-इंदूर विमानसेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 12:12 PM2020-12-17T12:12:18+5:302020-12-17T12:12:43+5:30
Nagpur News हिवाळ्यात इंडिगो एअरलाईन्स नागपूरने गोवा व इंदूरसाठी बुधवारी १६ डिसेंबरला विमानसेवा सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिवाळ्यात इंडिगो एअरलाईन्स नागपूरने गोवा व इंदूरसाठी बुधवारी १६ डिसेंबरला विमानसेवा सुरू केली आहे. यात फ्लाईट क्रमांक ६ ई ९१९ नागपूर-गोवा हे विमान रात्री ८ वाजता रवाना झाले. तर ६ ई ९२१ गोवा-नागपूर रात्री १२ वाजता रवाना होत आहे. त्यानंतर ६ ई ९१५ सकाळी ७.३५ वाजता पुण्यासाठी सुरू आहे. या विमानाचे संचालन एअरबस ३२० विमानाने करण्यात येत आहे. या विमानाची प्रवासी क्षमता १८० आहे. याशिवाय ६ ई ७२५१ नागपूर-इंदूर सकाळी ९ वाजता रवाना झाले. ६ ई ७२५२ इंदूर-नागपूर दुपारी ४.३० वाजता नागपुरात पोहोचले. इंदूर फ्लाईटचे संचालन एटीआर विमानाने होणार आहे. याची प्रवासी क्षमता ७२ आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या उड्डाणांशिवाय इंडिगोचे मंगळवारी फ्लाईट क्रमांक ५८१/५८२ नागपूर-बंगळुरू-नागपूरही सुरू झाले आहे. हे विमान नागपूरवरून सकाळी १० वाजता उड्डाण घेत आहे.