आत्मविश्वासाने ध्येय गाठा  : जगदीश अग्रवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:10 AM2018-04-04T00:10:09+5:302018-04-04T00:17:11+5:30

आयुष्यात ध्येय निश्चित करणे आवश्यक असते. ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची नितांत आवश्यकता असते. आपल्या ध्येयाशी प्रामणिक राहल तर यशापर्यंत पोहचण्यासाठी कोणतीच अडचण निर्माण होणार नाही. लक्ष्याच्या प्राप्तीपर्यंत थांबू नका, आत्मविश्वासाने सामोरे जा, हा गुरुमंत्र अग्रवाल स्टडी सेंटर प्रा. लि.चे संचालक व चाणक्य कौन्सिलिंग सेंटरचे करिअर र्कौन्सिलर जगदीश अग्रवाल यांनी येथे दिला.

Goal of Confidence: Jagdish Agarwal | आत्मविश्वासाने ध्येय गाठा  : जगदीश अग्रवाल

आत्मविश्वासाने ध्येय गाठा  : जगदीश अग्रवाल

Next
ठळक मुद्देलोकमत कॅम्पस क्लब व चाणक्य कौन्सिलिंग सेंटरतर्फे ‘दहावीनंतर काय?’

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : आयुष्यात ध्येय निश्चित करणे आवश्यक असते. ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची नितांत आवश्यकता असते. आपल्या ध्येयाशी प्रामणिक राहल तर यशापर्यंत पोहचण्यासाठी कोणतीच अडचण निर्माण होणार नाही. लक्ष्याच्या प्राप्तीपर्यंत थांबू नका, आत्मविश्वासाने सामोरे जा, हा गुरुमंत्र अग्रवाल स्टडी सेंटर प्रा. लि.चे संचालक व चाणक्य कौन्सिलिंग सेंटरचे करिअर र्कौन्सिलर जगदीश अग्रवाल यांनी येथे दिला.
लोकमत कॅम्पस क्लब व चाणक्य कौन्सिलिंग सेंटरच्यावतीने नि:शुल्क करिअर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांना त्यांनी मार्गदर्शन केले. सक्करदरा येथील कमला नेहरू महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित ‘दहावीनंतर काय?’ या कार्यक्रमांतर्गत चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘नो युवर टॅलेंट अकॅडमी’च्या संचालिका डॉ. रश्मी शुक्ला यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार करिअर निवडण्याचा सल्ला दिला. या चर्चासत्रात महाविद्यालय, करिअर, स्ट्रीम, कोचिंग, व्यक्तिमत्त्व विकास आदींवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.
करिअर निवडताना तीन गोष्टींचा विचार करा
डॉ. रश्मी शुक्ला म्हणाल्या, विद्यार्थ्यांचे करिअर निवडताना पालकांना प्रश्न पडतो की, ‘स्कोप’ कशात जास्त आहे. ‘स्कोप’वर करिअरची निवड करण्यापेक्षा या तीन गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे आहे. एक मुलाची आवड, दुसरी त्याची क्षमता, तिसरी महत्त्वाची त्याची पात्रता, याचा विचार करून करिअर निवडले पाहिजे. अनेकजण उपलब्ध कोर्सपैकी सुरक्षित करिअरची निवड करतात. करिअरच्या बाबतीत फार चोखंदळ बनू नका. आवडीचे करिअर तयार करण्यासाठी प्रयत्न करा. दुर्दैवाने आवडीचे करिअर मिळाले नाही तर निराश होऊ नका, असा सल्लाही त्यांनी दिला.

Web Title: Goal of Confidence: Jagdish Agarwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.