बकरी चाेर अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:41 AM2021-02-05T04:41:32+5:302021-02-05T04:41:32+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : नागपूर जिल्ह्यात बकऱ्या चाेरीला जाण्याचे प्रमाण वाढत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माैदा पाेलीस ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : नागपूर जिल्ह्यात बकऱ्या चाेरीला जाण्याचे प्रमाण वाढत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील जाखेगाव (ता. कामठी) शिवारात कारवाई करीत तीन चाेरट्यांना अटक केली. त्यांनी विविध ठिकाणांहून बकऱ्या चाेरून नेल्याचे कबूल केले असून, पाेलिसांनी त्यांच्याकडून एकूण २ लाख ९३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि. १) मध्यरात्री करण्यात आली.
जितेंद्र ऊर्फ जितू रामदास मानवटकर (४०), विनाेद उमराव आकरे (३२), दाेघेही रा. जाखेगाव, ता. कामठी व बाेधीसत्व सुखराम शेंडे (४१, रा. परसाेडी) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना त्यांना विनाेद आकरे हा बकऱ्या चाेरीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याचे तसेच ताे जाखेगाव शिवारातील पाेल्ट्री फार्मजवळ बसला असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पाेलिसांनी लगेच पाेल्ट्री फार्म गाठून विनाेदला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावे सांगितली. त्यामुळे याच पथकाने उर्वरित दाेघांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली.
त्यांच्याकडून २ लाख १३ हजार रुपये किमतीचे एमएच-२९/एआर-०६५२ क्रमांकाची कार आणि चाेरीच्या बकऱ्या विकून मिळविलेले ८३ हजार रुपये राेख असा एकूण २ लाख ९३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, जितेंद्र वैरागडे, उपनिरीक्षक जावेद शेख, सहायक फाैजदार लक्ष्मीप्रसाद दुबे, प्रणय बनाफर, विनाेद काळे यांच्या पथकाने केली.
...
१० गुन्हे उघड
या तिन्ही चाेरट्यांनी उमरेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीत पाच, कुही व अराेली (ता. माैदा) पाेलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी दाेन आणि माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीत एक अशा एकूण १० ठिकाणांहून बकऱ्यांची चाेरी केल्याचे सांगितले. या चाेरीसाठी त्यांनी त्यांच्याच गावातील चार अल्पवयीन मुलांचा वापर केल्याचेही सांगितले, अशी माहिती पाेलीस निरीक्षक अलिल जिट्टावार यांनी दिली.