झाडे कापणाऱ्यांना सद्बुद्धी दे रे देवा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:07 AM2021-06-11T04:07:11+5:302021-06-11T04:07:11+5:30
नागपूर : अजनी भागातील पंप हाऊससमाेर हाेमकुंड लागले, त्यात दूध, धूप, तूप टाकून अग्नि पेटला आणि पंडितजी मंत्राेच्चाराने ईश्वराची ...
नागपूर : अजनी भागातील पंप हाऊससमाेर हाेमकुंड लागले, त्यात दूध, धूप, तूप टाकून अग्नि पेटला आणि पंडितजी मंत्राेच्चाराने ईश्वराची आराधना करीत हाेते. हे सारे हाेमहवन शांती करण्यासाठी किंवा काैटुंबिक शुभकार्य करण्यासाठी नव्हे तर अजनी वन भागात ताेडण्यात येणारी हजाराे झाडे वाचविण्यासाठी हा खटाटाेप चालला आहे. वृक्षमित्रांनी थेट देवाला साकडे घातले आहे. निर्माण झालेल्या निसर्गाच्या समस्या दूर करण्यासाठी वृक्षसंवर्धनाची गरज असताना येथे हजाराे झाडे बेमुर्वत कापणाऱ्यांना देवाने सद्बुद्धी द्यावी, या भावनेतून अजनी परिसरात हे हाेमहवन करण्यात आले.
एनएचएआयच्या आयएमएस प्रकल्पासाठी अजनी वन परिसरातील हजाराे झाडे ताेडण्यात येत आहेत. एका माहितीप्रमाणे चार टप्प्यात ४० हजारांवर झाडे कापली जाणार आहेत. त्याविराेधात आंदाेलन चालले असून, ‘हम नागपूरकर’ या संघटनेच्या माध्यमातून नगरसेवक मनाेज गावंडे आणि वृक्षमित्र मनीष चांदेकर यांच्या नेतृत्वात हे अनाेखे आंदाेलन करण्यात आले. ग्रीनसिटी म्हणून असलेली नागपूरची ओळख पुसत चालली आहे. राज्य शासनाच्या ‘माजी वसुंधरा माझी जबाबदारी’ या अभियानात नागपूर शहर २८ व्या स्थानावर फेकल्या गेले आहे. अशावेळी असलेली झाडे वाचविणे ही लाेकांची जबाबदारी आहे. विकास कार्याला अडथळा घालण्याचे कारण नाही. पण पर्यावरणाला हानी पाेहोचविणारा विकास काय कामाचा, असा सवाल मनीष चांदेकर यांनी केला. अशा भकास हाेणाऱ्या शहराला ईश्वरानेच वाचवावे, अशी आर्त हाक वृक्षप्रेमींनी दिली.
मनाेज गावंडे म्हणाले, अजनीचा परिसर रेल्वेची जागा आहे आणि याच भागातून ही झाडे कापली जाणार आहेत. त्यामुळे रेल्वेमंत्री पीयूष गाेयल यांची संमती आहे का, असा सवाल करीत आता पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनीच झाडे वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी वृक्षप्रेमी सतीश यादव, भरत यादव, मुकेश शर्मा आदी उपस्थित हाेते.
जन अधिकारतर्फे निषेध
जन अधिकार पार्टीनेही अजनी वनातील वृक्षताेडीचा निषेध केला आहे. विकासाच्या नावाखाली १००-१५० वर्षे जुनी हजाराे झाडे कापून पर्यावरणाची हानी केली जात आहे आणि दुसरीकडे वृक्षलागवड करण्याचा बागुलबुवा करून जनतेची फसवणूक केली जात असल्याचा आराेप पार्टीचे वासुदेव चाैधरी यांनी केला. वसुंधरेची हानी करण्याची या सरकारला हाैस आहे का, असा सवाल त्यांनी केला. या निषेध आंदाेलनात सुषमा माैर्य, फिराेज शेख, मुकेश माैर्य, प्रभाकर वानखडे, पंढरी देशमुख, गीता भडकवाडे, गीता दायीर, लता राऊत आदींचा सहभाग हाेता.