नागपुरातील कोराडीची देवी भाविकांना दिवसातून तीन रूपात देते दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 11:16 PM2023-10-15T23:16:17+5:302023-10-15T23:16:37+5:30
कोराडी देवी दिवसातून तीन रूपात भाविकांना दर्शन देते, अशी आख्यायिका आहे.
- सुरभी शिरपूरकर
या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: .... आज घटस्थापनेपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. तर नागपुरात देखील कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबेच्या अश्विन नवरात्र उत्सवाला मोठ्या आनंदात आणि उत्साहात सुरुवात झाली आहे. नागपूरजवळ असणारे कोराडी महालक्ष्मी जगदंबा मंदिर हे विदर्भवासियांचे शक्तीपीठ आहे. कोराडी देवी दिवसातून तीन रूपात भाविकांना दर्शन देते, अशी आख्यायिका आहे.
कोराडी महालक्ष्मी जगदंबा मंदिर हे मध्य भारतातील एक महत्त्वाचे मंदिर आहे. जगदंबा आणि महालक्ष्मी असे दोन्ही रूप एकाच देवी मध्ये बघायला मिळतात. तसे तर विदर्भात अनेक धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असणारी मंदिरे आहेत मात्र नागपूर शहरापासून दक्षिणेस अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेले कोराडी महालक्ष्मी जगदंबा मंदिर हे तमाम भाविकांचे शक्तीपीठ आहे. विदर्भासह लगतच्या राज्यांमधून दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. देवीच्या मंदिराचा इतिहास शेकडो वर्ष पुरातन असून नवसाला पावणारी कोराडी देवी मानली जाते.
वर्षातून आईचं ज्या स्वयंभू साक्षात स्वरूपात आहे, ते दर्शन चैत्र महिन्यात होतं. संच अश्विन प्रतिपदेच्या दिवशी या स्वयंभू मूर्तीचं दर्शन भक्तांना होत असे. पूर्वी कोराडी हे जाखापुर या नावाने ओळखला जात होतं. झोलन राजा आणि जखोमा बाईची आख्यायिका अशी सुद्धा सांगितली जाते. राजा झोलन याला जनोबा, नानोबा, बानोबा, भैरोबा, खैरोबा, अगनोबा आणि दत्तासुर असे सातपुत्र होते. परंतु एकही कन्यारत्न नसल्याने राजा दुःखी होता. त्याने पूजा हवन तपश्चर्या करून देवांना प्रसन्न केलं आणि एक कन्यारत्न मागितले. दिव्य पवित्र तेजोमय रूप गुण संपन्न कन्येच्या रूपाने अवतरलेल्या आदी मायेच्या अनेक दिव्य अद्भुती राजाला येत असे. तिने राजाला अनेक कठीण प्रसंगात मार्गदर्शन करून योग्य निर्णयाप्रत पोहोचवलं. असं म्हणतात एका युद्धप्रसंगी तिन राजाच्या शत्रु विषय देखील योग्य निर्णय देऊन न्यायप्रियतेचे दर्शन घडविला.