विहिरीत उतरताय, सावधान! जीव धोक्यात येऊ शकतो

By निशांत वानखेडे | Published: July 11, 2023 05:52 PM2023-07-11T17:52:15+5:302023-07-11T17:53:01+5:30

१५ दिवसात दोन घटनांमध्ये ५ मृत्यू : आतमध्ये कोणता जीवघेणा गॅस असतो?

Going down the well, be careful! Life may be in danger; 5 deaths in two incidents in 15 days | विहिरीत उतरताय, सावधान! जीव धोक्यात येऊ शकतो

विहिरीत उतरताय, सावधान! जीव धोक्यात येऊ शकतो

googlenewsNext

नागपूर : सोमवारी गोंदियाच्या बिरसोला या गावी विहिरीतील मोटरपंप काढायला गेलेल्या शेतकऱ्याचा विषारी वायुमुळे मृत्यू झाला. आठवड्याभरापूर्वीच गोंदिया जिल्ह्याच्या सरांडी गावी विहिरीतील विषारी वायू गळतीमुळे चार जणांचा गुदमरुन विहिरीतच मृत्यू झाला होता. यापूर्वी मध्य प्रदेशातही सेप्टीक टॅंकमध्ये उतरलेल्या चौघांचा जीव गेला होता. अशा घटना वारंवार समोर येत आहेत आणि तरीही लोक दुर्लक्षितपणे मृत्यूला आमंत्रण देतात. विहिरीच्या खोलात असे काय असते, ज्यातून विषारी वायू तयार होतात आणि असे कोणते विषारी वायू असतात की ज्यामुळे मनुष्य क्षणात मृत्यूच्या दाढेत जातो.

यामागचे कारण जाणणे गरजेचे आहे. खुप दिवस बंद असलेल्या किंवा कचरा साचलेल्या विहिरीमध्ये कार्बन मोनाक्साईड व मिथेन ही दोन अत्यंत विषारी वायू तयार होतात. या दोन्ही वायुमुळे तुम्ही काही सेकंदात बेशुद्ध पडू शकता व उपचार झाले नाही तर काही मिनिटातच मृत्यूही ओढवतो. त्यामुळे विहिरीत उतरताना सावधगिरी बाळगा, अन्यथा जीव गेलाच म्हणून समजा. याबाबतचे विशेषज्ञ शरद पालिवाल यांनी सविस्तर माहिती दिली.

कार्बन मोनाक्साईड

कार्बन मोनाक्साईड (CO) हा रंगहिन व गंधहिन वायु असून अत्यंत विषारी आहे. वायु, लाकूड किंवा तेल अर्धवट जळले तर त्यातून हा वायु तयार होतो. हा वायु हवेपेक्षा थोडा हलका आहे. विहिर खुप दिवस बंद असल्यास विहिरीत तो तयार होतो. जमिनीतूनही तो येऊ शकतो. विहिरीतील पाण्याची हालचाल होत नसेल किंवा व्हेंटीलेशन मिळत नसल्यास हा वायु हमखास तयार होतो व स्थिरावतो.

मिथेन वायु (Ch4)

मिथेन वायु अत्यंत ज्वलनशील वायु म्हणून ओळखला जातो. आपल्या घरातील गॅस सिलेंडरमध्ये हाच वायु असतो. सडलेला कचरा, मलमुत्र याचे मिश्रणातून तो तयार होतो. गोबरगॅस किंवा बॉयोगॅस हे त्याचे उदाहरण आहे.

हे वायु किती धोकादायक आहेत?

- कार्बन मोनाक्साईड हा वायु कार्बन डायऑक्साईड (CO२) नैसर्गिकरित्या मनुष्याच्या फुप्फूसातून ऑक्सिजन ओढून घेतो. ही क्रिया काही सेकंदातच घडते. त्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजनची तीव्र टंचाई निर्माण होऊन मनुष्य गुदमरून बेशुद्ध पडतो. त्वरीत उपचार न केल्यास काही मिनिटात माणूस मृत्यूच्या दाढेत लोटला जातो.

- मिथेन असल्यास शरीरातून ऑक्सिजन शोषून कार्बन डायऑक्साईड तयार करतो. अधिक प्रभावात आल्यास मनुष्य बेशुद्ध पडून काही वेळात मृत्यू पावतो. मात्र कार्बन मोनाक्साईडपेक्षा मिथेन कमी जीवघेणा आहे. प्रमाण कमी असल्यास उपचाराला वेळ मिळू शकतो.

मोटरपंप जळाल्यानेही होते कार्बन मोनाक्साईड

पाण्याच्या मोटरपंप बंद असल्यास किंवा जळाल्यास त्यातूनही कार्बन मोनाक्साईड बाहेर निघतो. त्याच्या उत्सर्जनासाठी प्राणवायु मिळाला नाही तर हा वायु तिथेच स्थिरावतो. नेमकी तिच मोटार दुरुस्तीसाठी गेल्यास धोक्याची शक्यता खुप जास्त असते.

विहिरीत उतरण्यापूर्वी काय करावे?

- एकतर सुरक्षेचे पूर्ण साहित्य असतील तरच विहिरीत उतरावे, अन्यथा उतरूच नये.

- बंद विहिरीत उतरण्यापूर्वी आधी जळता दिवा किंवा पेटती काडी सोडावी. दिवा किंवा काडी विझल्यास येथे कार्बन मोनाक्साईड असेल किंवा आगीचा भपका घेतल्यास मिथेन आहे, असे समजावे.
- त्यानंतर व्हेंटीलेशन, पाण्याची हालचाल व पूर्ण उपाय करूनच विहिरीत उतरावे.

Web Title: Going down the well, be careful! Life may be in danger; 5 deaths in two incidents in 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.