गोकुळपेठ बाजारातील अतिक्रमण हटविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 01:37 AM2017-10-29T01:37:02+5:302017-10-29T01:37:20+5:30
शहरातील महत्त्वाचे चौक, प्रमुख व वर्दळीच्या रस्त्यांच्या फूटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. प्रवर्तन विभागाची यंत्रणा याची दखल घेत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील महत्त्वाचे चौक, प्रमुख व वर्दळीच्या रस्त्यांच्या फूटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. प्रवर्तन विभागाची यंत्रणा याची दखल घेत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने अतिक्रमण विरोधातील कारवाईला सुरुवात केली आहे. गोकुळपेठ भागातील अतिक्रमण चार दिवसात हटविले जाणार आहे.
अतिक्रमण समस्येकडे प्रशासन व पदाधिकाºयांचे लक्ष वेधण्यासाठी ‘लोकमत’ने शहरातील अतिक्रमणाच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे. याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. अतिक्रमण हटविण्याचे प्रवर्तन विभागाला निर्देश दिले. त्यानुसार कारवाईला सुरुवात केली आहे. यासोबतच पदाधिकारी कामाला लागले आहेत.
शनिवारी पदाधिकाºयांनी गोकुळपेठ भागातील अतिक्रमणाचा आढावा घेतला. धरमपेठ झोनच्या सभापती रूपा राय, स्थापत्य व प्रकल्प सभापती संजय बंगाले, परिवहन समिती बंटी कुकडे, नगरसेवक निशांत गांधी, सुनील हिरणवार, धरमपेठ झोन सहायक आयुक्त महेश मोरोणे, वाहतूक पोलीस निरीक्षक (पश्चिम विभाग) जयेश भांडारकर, अतिरिक्त पोलीस निरीक्षक परमार आदींनी धरमपेठ झोनमधील अतिक्रमणाची पाहणी केली. चार दिवसात अतिक्रमण काढण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले.
धरमपेठ येथे वेस्ट हायकोर्ट रोडवर व्हीआयपींचे निवासस्थान आहे. तेथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असूनही लगतच्या भागात अतिक्रमणाची समस्या आहे. या भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात यावा, अशी मागणी पदाधिकाºयांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकु ळे यांच्याकडे केली आहे. बावनकुळे यांनी याला संमती दर्शविली आहे. महत्त्त्वाच्या व्यक्तींचे वास्तव्य असूनही गोकुळपेठ परिसरात अस्वच्छता आहे तसेच अतिक्रमणाची गंभीर समस्या आहे. चार दिवसात अतिक्रमण हटवून परिसरात स्वच्छता ठेवण्याचे निदेंश प्रशासनाला दिले तसेच पार्किंगची समस्या मार्गी लावण्याची सूचना केली.