महिन्याभरात सोने ११ वेळ ६३ हजारांवर! मौल्यवान धातूच्या दरवाढीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 11:09 PM2024-01-30T23:09:37+5:302024-01-30T23:10:14+5:30

आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या आर्थिक घडामोडींचा परिणाम नागपुरात सराफा बाजारात नेहमीच दिसून येतो.

Gold at 63 thousand 11 times in a month! Precious metal prices likely to rise | महिन्याभरात सोने ११ वेळ ६३ हजारांवर! मौल्यवान धातूच्या दरवाढीची शक्यता

महिन्याभरात सोने ११ वेळ ६३ हजारांवर! मौल्यवान धातूच्या दरवाढीची शक्यता

नागपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या आर्थिक घडामोडींचा परिणाम नागपुरात सराफा बाजारात नेहमीच दिसून येतो. यावर्षी जानेवारी महिन्यात सोन्याचे दर तब्बल ११ वेळ ६३ हजारांवर पोहोचले. दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचा दर (९९.९ टक्के शुद्धता) ६३ हजार रुपये असल्यास ३ टक्के जीएसटीसह भाव ६५ हजारांवर जातात. सोन्याच्या दरवाढीमुळे गुंतवणुकदारांची खरेदी वाढली आहे.

जानेवारी महिन्यात १८ रोजी सोन्याचे दर सर्वात कमी ६२,३०० रुपये होते. १ ते ३० जानेवारीदरम्यान ६२,३०० ते ६३,७०० रुपयांदरम्यान चढउतार होत राहिली. नवीन वर्षात १ जानेवारीला सोने ६३,७०० आणि २ रोजी ६३,८०० रुपये तर ३० जानेवारीला भाव ६३,१०० रुपये होते.  गेल्यावर्षी २८ डिसेंबर रोजी सोने ६३,८०० रुपयांवर पोहोचले होते, हे विशेष. याच कारणांनी फेब्रुवारी महिन्यात दरवाढीची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविली आहे. तर दुसरीकडे १ जानेवारीला चांदी दर प्रति किलो ७४,३०० रुपये आणि ३० रोजी ७२,५०० रुपयांपर्यंत कमी झाले. औद्योगिक क्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे दरात घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सोने-चांदीचे दर (रुपयात)

दिनांक १० ग्रॅम सोने किलो चांदी
१ जाने. ६३,७०० ७४,३००
२ जाने. ६३,८०० ७४,३००
३ जाने. ६३,४०० ७३,२००
४ जाने. ६३,१०० ७२,३००
५ जाने. ६३,००० ७२,५००
६ जाने. ६३,००० ७२,९००
१२ जाने. ६३,१०० ७३,०००
१५ जाने. ६३,००० ७२,९००
१६ जाने. ६३,००० ७२,६००
२९ जाने. ६३,००० ७२,४००
३० जाने. ६३,१०० ७२,५००
(३ टक्के जीएसटी वेगळा)

Web Title: Gold at 63 thousand 11 times in a month! Precious metal prices likely to rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.