सोन्याने सर्वच रेकॉर्ड मोडले!

By मोरेश्वर मानापुरे | Published: March 5, 2024 09:46 PM2024-03-05T21:46:09+5:302024-03-05T21:46:29+5:30

एकाच दिवसात १,१०० रुपयांची वाढ; जीएसटी वगळता ६५,१०० रुपये भाव.

gold broke all the records | सोन्याने सर्वच रेकॉर्ड मोडले!

सोन्याने सर्वच रेकॉर्ड मोडले!

नागपूर : लग्नाच्या हंगामासाठी सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना आता जास्त पैसे खर्च करावे लागणार आहे. नागपुरात मंगळवारी दहा ग्रॅम २४ कॅरेट (९९.५ टक्के शुद्ध) सोन्याने ६५,१०० रुपयांचा पल्ला ओलांडला. हेच दर ३ टक्के जीएसटीसह ६७ हजारांवर पोहोचले. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी १,१०० रुपयांची वाढ झाली आणि सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडले. 

दागिन्यांची निर्मिती २२ कॅरेट (९१.६ टक्के शुद्ध) सोन्याने होते. या सोन्याचे दर ६०,५०० आणि ३ टक्के जीएसटीसह ६२,३०० रुपयांवर गेले आहेत. याशिवाय दागिन्यांवर ग्राहकांना मेकिंग शुल्क १३ ते २० टक्के वेगळे द्यावे लागतात. प्रति किलो चांदीचे दरही जीएसटी वगळून ७३,३०० रुपयांवर गेले आहेत.

सोन्याच्या गुंतवणुकीकडे सुरक्षित मालमत्ता म्हणून पाहिले जाते. जागतिक समभागांमध्ये सातत्याने होणारी वाढ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या अनिश्चिततेच्या वातावरणामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले आहेत. या वातावरणामुळे गुंतवणूकदारही उत्साहित आहेत. सोन्याच्या दरवाढीमुळे शेअर बाजारात नक्कीच घसरण होईल आणि सोन्याचे भाव पुढील काही दिवसांत आणखी वाढतील, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: gold broke all the records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं