नागपूर व चंद्रपुरात श्रीरामांची प्रतिमा असलेले ‘सुवर्ण नाणे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 10:42 AM2020-08-05T10:42:00+5:302020-08-05T10:42:32+5:30

चंद्रपुरातील इतिहास संशोधक अशोकसिंह ठाकूर यांनी आपल्याकडे बाराव्या शतकातील सुवर्णमुद्रा असल्याचा दावा केला आहे. तर नागपुरातही दीपक संत यांच्या संग्रहात प्रभू श्रीरामाचे चित्र असलेली दुर्मिळ तांब्याची नाणी आहेत.

'Gold coin' with image of Shri Ram in Nagpur and Chandrapur | नागपूर व चंद्रपुरात श्रीरामांची प्रतिमा असलेले ‘सुवर्ण नाणे’

नागपूर व चंद्रपुरात श्रीरामांची प्रतिमा असलेले ‘सुवर्ण नाणे’

googlenewsNext
ठळक मुद्देविग्रहराज-४ राजाच्या कार्यकाळातील निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चंद्रपुरातील इतिहास संशोधक तथा भारतीय सांस्कृतिक निधीचे संयोजक अशोकसिंह ठाकूर यांनी आपल्याकडे १२ व्या शतकातील सुवर्ण नाणे असल्याचा दावा केला आहे. अयोद्धेला श्रीरामांच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त साधून ठाकूर यांनी बाराव्या शतकातील सुवर्णमुद्रा असल्याचा दावा केल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे. तर नागपुरातही दीपक संत यांच्या संग्रहात प्रभू श्रीरामाचे चित्र असलेली दुर्मिळ तांब्याची नाणी आहेत.

ठाकूर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये राज्य करणाऱ्या साकंबरी (शांबर) चहमान या राजवंशाच्या विग्रहराज-४ या राजाच्या कार्यकाळात हे सुवर्ण नाणे छापण्यात आले होते. या राजाचा कार्यकाळ इ.स. ११५३ ते ११६३ असा असून या काळातच हे नाणे छापण्यात आल्याचे संशोधन आहे. या नाण्याच्या एका बाजूला प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिमा अंकित असून त्यांच्या एका हातात धनुष्य व दुसऱ्या हातात बाण अंकित आहे. त्यावर ‘श्रीराम’ असे लिहिलेले असून नाण्यावरील प्रतिमेला फुलांची सजावट आहे. कमळाची फुले, सोबत हंस पक्षी यावर अंकित आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला देवनागरी भाषेत तीन ओळीत ‘श्रीमदविग्र/हराजदे/व’ असे लिहिलेले आहे. या नाण्याचे वजन ४.०२ ग्रॅम आहे.

ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राचीन काळी मंदिरात शिल्पकलेचा वापर केला जायचा, तसाच वापर या नाण्याच्या सजावटीसाठी केला आहे. देशात केवळ दोघांकडेच हे नाणे असून उत्तम अवस्थेतील व दुर्मिळ आहे. ऑर्कालॉजिकल विभागाच्या नियमानुसार दुर्मिळ ताम्रपत्र, अतिप्राचीन मूर्ती जवळ बाळगण्यास मनाई आहे; मात्र नाणे बाळगण्यासाठी अधिकृत नाणे संग्राहकांना परवानगी आहे. आपल्याकडे २७ हजार दुर्मिळ नाणी असून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी छापण्यात आलेल्या दोन सुवर्णमुद्रा (होन) असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

नागपुरात प्रभू श्रीराम यांचे दुर्मिळ नाणे
नागपुरातील दीपक संत यांच्या संग्रहात प्रभू श्रीरामाचे चित्र असलेली दुर्मिळ तांब्याची नाणी आहेत. यावर एका बाजूने प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमानाचे चित्र काढलेले आहे. तर दुसऱ्या भागात प्रभू श्रीराम आणि सीतेचे चित्र काढलेले आहे. दीपक संत यांना ५० वर्षापूर्वी हे नाणे मिळाले होते. त्यांनी सांगितल्यानुसार हे नाणे राजे महाराजांच्या काळातील आहे. हे नाणे चलनात नव्हते, श्रद्धेपोटी ही नाणी राजे महाराजे स्वत:जवळ बाळगत होते. दीपक संत हे जुन्या नाण्यांचे संग्राहक आहेत. त्यांच्या संकलनात असलेले हे दुर्मिळ नाणे आहे. नाणे संग्राहकांना परवानगी आहे. आपल्याकडे २७ हजार दुर्मिळ नाणी असून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी छापण्यात आलेल्या दोन सुवर्णमुद्रा (होन) असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

 

Web Title: 'Gold coin' with image of Shri Ram in Nagpur and Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.