सुवर्ण सखी अलंकारतर्फे सोन्याच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:07 AM2021-02-10T04:07:51+5:302021-02-10T04:07:51+5:30
चंद्रपूर : केंद्र्र सरकारच्या सूक्ष्म लघु व मध्यम मंत्रालय दिल्ली आणि सुवर्ण सखी अलंकार ज्वेलर्सतर्फे जैन भवन, गांधी ...
चंद्रपूर : केंद्र्र सरकारच्या सूक्ष्म लघु व मध्यम मंत्रालय दिल्ली आणि सुवर्ण सखी अलंकार ज्वेलर्सतर्फे जैन भवन, गांधी चौक, चंद्रपूर येथे एक आणि दोन ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. उद्घाटन मनसेच्या जिल्हाध्क्षा सुनीता गायकवाड आणि ग्रामीण पत्रकार संघाचे सचिव विनोद पन्नासे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रीती रामटेके, अर्चना आमटे आणि कंपनीचे संचालक राजेश मदने उपस्थित होते. प्रदर्शन ९ ते १४ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. प्रदर्शनात सहा हजार किमतीचे दोन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र ३,१९९ रुपयात असून, सोबत एक ग्रॅम सोन्याचा नेकलेस, चार बांगड्या व कानातले मोफत देण्यात येत आहे. एक हजाराची कोल्हापुरी ठुशी, सी-झेड मंगळसूत्र अत्यंत कमी किमतीत आहे. प्रदर्शनातील सर्व दागिन्यांवर ५० टक्के सूट आहे. प्रदर्शनातून मिळणारी २० टक्के रक्कम अनाथ मुले व कॅन्सरग्रस्त मुलांच्या उपचारासाठी देण्यात येते. त्यामुळे ग्राहकांनी खरेदी करावी, असे आयोजकांनी म्हटले आहे. (वा.प्र.)