नागपुरात सोने जीएसटीसह १,०१,९७० रुपये! दोन दिवसात ३,२०० रुपयांनी वाढले

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 23, 2025 01:17 IST2025-04-23T01:16:17+5:302025-04-23T01:17:11+5:30

या विक्रमी दरवाढीमुळे सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे...

Gold in Nagpur is Rs 1,01,970 including GST It has increased by Rs 3,200 in two days | नागपुरात सोने जीएसटीसह १,०१,९७० रुपये! दोन दिवसात ३,२०० रुपयांनी वाढले

नागपुरात सोने जीएसटीसह १,०१,९७० रुपये! दोन दिवसात ३,२०० रुपयांनी वाढले

नागपूर : शेअर मार्केटमधील अनिश्चितता आणि राजकीय अस्थिरतेमुळे सोने दरदिवशी वाढतच आहेत. मंगळवारी पुन्हा विक्रमी झेप घेतली. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी दहा ग्रॅम शुद्ध (२४ कॅरेट) सोन्याच्या दरात १,५०० रुपयांची वाढ झाली. नागपुरात सोने ३ टक्के जीएसटीसह १,०१,९७० रुपयांवर पोहोचले. या विक्रमी दरवाढीमुळे सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

दोन दिवसांत सोने तोळ्यामागे ३,२०० रुपयांनी वाढले. मंगळवारी सकाळच्या सत्रात सोन्यात १,९०० रुपयांची वाढ झाली. दुपारपर्यंत ४०० रुपयांची घसरण होऊन भावपातळी ९९ हजारांपर्यंत खाली आली. सराफांच्या दुकानात दहा ग्रॅम (२४ कॅरेट) सोने जीएसटीसह १,०१,९७० रुपयांत विकल्या गेले. जीएसटीसह प्रति किलो चांदीचे भाव ९९,९१० रुपयांवर पोहोचले.

सोने-चांदीचे भाव (३ टक्के जीएसटीसह)
दिनांक सोन्याचे भाव चांदीचे भाव
१९ एप्रिल ९८,६७४ ९९,१८९
२१ एप्रिल १,००,४२५ ९९,९१०
२२ एप्रिल १,०१,९७० ९९,९१०

Web Title: Gold in Nagpur is Rs 1,01,970 including GST It has increased by Rs 3,200 in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.