बुधवारी सोने १,७००, चांदीत ७०० रुपयांची वाढ; आणखी भाव वाढण्याचे संकेत
By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 9, 2025 18:29 IST2025-04-09T18:28:14+5:302025-04-09T18:29:07+5:30
टॅरिफ इफेक्ट उतरला : ग्राहकांमध्ये संभ्रम

Gold rises by Rs 1,700, silver by Rs 700 on Wednesday; further price hike hinted
नागपूर : अमेरिकन टॅरिफचा परिणाम उतरू लागताच भारतात सोने आणि चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले. बुधवार, ९ रोजी नागपुरात दहा ग्रॅम सोन्याचे भाव १,७०० आणि चांदीचे भाव ७०० रुपयांनी वाढले. हे भाव १ एप्रिलच्या तुलनेत कमीच आहेत.
मंगळवारच्या तुलनेत बुधवारी सोने-चांदीच्या भावात पाचदा चढउतार झाली. मंगळवारच्या ८९ हजारांच्या तुलनेत बुधवारी बंद बाजारात सोन्याचे भाव १,७०० रुपयांनी वाढून ९०,७०० रुपयांवर गेले. याच तुलनेत चांदी ७०० रुपयांनी वाढून ९२,३०० रुपयांवर पोहोचली. आकडेवारीनुसार सोने आणि चांदीच्या भावात १ एप्रिलच्या तुलनेत वाढ झाली नाही. नऊ दिवसात सोने ७०० आणि चांदी ९,१०० रुपयांनी घसरली. पुढे दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव वाढतील, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.
दिनांक सोने चांदी
१ एप्रिल ९१,४०० १,०१,४००
९ एप्रिल ९०,७०० ९२,३००