टायगर श्रॉफला भेटण्याची सुवर्णसंधी

By admin | Published: July 11, 2017 01:24 AM2017-07-11T01:24:26+5:302017-07-11T01:24:26+5:30

प्रसिद्ध चित्रपट अभिनेता टायगर श्रॉफ आणि ‘लोकमत’तर्फे मायकल जॅक्सनच्या स्मृतिदिवसानिमित्त १२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता नृत्यांजली अर्पण करण्यात येणार आहे.

The golden opportunity to meet Tiger Shroff | टायगर श्रॉफला भेटण्याची सुवर्णसंधी

टायगर श्रॉफला भेटण्याची सुवर्णसंधी

Next

मायकल जॅक्सनला ‘लोकमत’ आणि ‘मुन्ना मायकेल’कडून नृत्यांजली : १२ जुलै रोजी आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रसिद्ध चित्रपट अभिनेता टायगर श्रॉफ आणि ‘लोकमत’तर्फे मायकल जॅक्सनच्या स्मृतिदिवसानिमित्त १२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता नृत्यांजली अर्पण करण्यात येणार आहे. ‘लोकमत’ आणि ‘प्रीति आयआयटी पिनॅकल’तर्फे रोजी कोराडी मार्गावरील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील ‘इन्डोअर स्टेडियम’मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी टायगरसमवेत अभिनेत्री निधी अग्रवालदेखील उपस्थित राहणार आहे; सोबतच सुप्रसिद्ध गायक सिद्धार्थ महादेवन हे देखील विशेष आकर्षण असतील.
सिद्धार्थ चित्रपटांतील सुपरहीट गाण्यांचे सादरीकरण करतील व टायगरचा ‘डान्स’ लोकांना नाचण्यास भाग पाडेल.
टायगर यावेळी आपल्या मनातील भावना रसिकांसोबत ‘शेअर’ करणार आहे. पास घेऊन ते कार्यक्रमासाठी आपले स्थान निश्चित करू शकतात. ‘लोकमत सखी मंच’, ‘कॅम्पस क्लब’ आणि
‘युवा नेक्स्ट’च्या सदस्यांना ओळखपत्र दाखविल्यावर तर वाचकांना जाहिरातीचे कात्रण आणून दिल्यानंतर दोन नि:शुल्क पासेस देण्यात येतील. ‘लोकमत सखी मंच’च्या कार्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे वितरण होईल. अधिक माहितीसाठी रामदासपेठ येथील पं. जवाहरलाल नेहरू मार्गावरील ‘लोकमत भवन’ येथे स्थित ‘लोकमत सखी मंच’च्या कार्यालयात ०७१२-२४२३५२७ या क्रमांकावर संपर्क केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे ‘पिकर आॅनलाईन’तर्फे मोफत पासेससाठी ‘आॅनलाईन बुकिंग’चीदेखील सुविधा देण्यात आली आहे. ६६६.स्र्रू‘ी१ङ्मल्ल’्रल्ली.ूङ्मे वर ‘लॉगआॅन’ करता येईल किंवा ‘पिकर आॅनलाईन’च्या १४/१, १४/२ सूत्र ट्रायटॅक प्रा.लि., आयटी पार्क, गायत्रीनगर येथील कार्यालयातून पासेस घेता येतील.

या संस्थांचे मिळत आहे सहकार्य
कार्यक्रमाला मोदी लेन्स मॉल प्रा.लि., उमंग ग्रुप (उमंग गीताई गर्ल्स कॉलेज), ‘पिकर आॅनलाईन’ आणि कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानचे शशिकांत बोदड हे सहकार्य करीत आहेत. ‘हॉस्पिटॅलिटी पार्टनर’ म्हणून ‘हॉटेल सेंटर पॉर्इंट’चे सहकार्य मिळत आहे. ‘टायगर’ आगामी चित्रपट ‘मुन्ना मायकल’च्या ‘प्रमोशन’साठी नागपुरात येत आहे. २१ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून ‘इरॉस इंटरनॅशनल’ आणि विकी राजानी हे निर्माता आहेत, तर सब्बीर खान हे दिग्दर्शक आहेत.

Web Title: The golden opportunity to meet Tiger Shroff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.