महाआवास योजनेत गोंदिया व वर्धा जिल्हा प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:12 AM2021-08-27T04:12:06+5:302021-08-27T04:12:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत विभागीय स्तरामध्ये केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचा प्रथम ...

Gondia and Wardha districts first in Mahawas scheme | महाआवास योजनेत गोंदिया व वर्धा जिल्हा प्रथम

महाआवास योजनेत गोंदिया व वर्धा जिल्हा प्रथम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत विभागीय स्तरामध्ये केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचा प्रथम पुरस्कार गोंदिया जिल्ह्याला तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये सर्वोकृष्ट जिल्हा म्हणून वर्धा जिल्ह्याची निवड झाली आहे. येत्या ३० ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यात विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांच्या हस्ते महाआवास अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हे, तालुके तसेच उत्कृष्ट ग्रामपंचायतींना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत विभागीय स्तरामध्ये केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचा प्रथम पुरस्कार गोंदिया जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. तसेच द्वितीय पुरस्कार भंडारा जिल्हा तर तृतीय पुरस्कारासाठी वर्धा जिल्ह्याची निवड झाली आहे. उत्कृष्ट तालुक्यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय तालुका म्हणून गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, गोंदिया व तिरोडा पंचायत समितीला अनुक्रमे पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यासोबतच उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून गोंदिया जिल्ह्यातील तळेगाव, द्वितीय कोरंबी तसेच केसोरी या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावाची निवड झाली आहे. तृतीय पुरस्कार वर्धा जिल्ह्यातील झंझाडा ग्रामपंचायतीची निवड झाली आहे.

राज्य पुरस्कृत आवास योजनेत वर्धा प्रथम

राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये सर्वोकृष्ट जिल्हा म्हणून वर्धा जिल्ह्याची निवड झाली आहे. द्वितीय क्रमांक भंडारा जिल्ह्याला तर तृतीय क्रमांक चंद्रपूर जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. उत्कृष्ट तालुक्यामध्ये प्रथम सडक अर्जुनी (गोंदिया), द्वितीय लाखांदूर, तृतीय पवनी पंचायत समिती, जिल्हा भंडारा यांची निवड झाली आहे.

उत्कृष्ट ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत बोरगाव (चंद्रपूर), द्वितीय दिघोरी (भंडारा) तर तृतीय सानगाव (साकोली) व ग्रामपंचायत चिचूर (कुही) नागपूर जिल्ह्याची निवड झाली आहे.

Web Title: Gondia and Wardha districts first in Mahawas scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.