गोंदिया : पोलीस अधीक्षकांच्या डोळ्यादेखत भरती, ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर 

By नरेश रहिले | Published: June 17, 2024 03:50 PM2024-06-17T15:50:01+5:302024-06-17T15:50:54+5:30

१९ जूनपासून पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला होणार सुरुवात.

Gondia Recruitment under the watchful eye of Superintendent of Police 70 CCTV cameras  | गोंदिया : पोलीस अधीक्षकांच्या डोळ्यादेखत भरती, ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर 

गोंदिया : पोलीस अधीक्षकांच्या डोळ्यादेखत भरती, ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर 

गोंदिया : जिल्हा पोलीस आस्थापनेवरील रिक्त पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदाची भरती १९ जूनपासून होत आहे. ११० पाेलीस कर्मचारी जागांसाठी ८ हजार २६ उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज केले आहे. त्यामुळे एका जागेसाठी तब्बल ७३ उमेदवार रिंगणात आहेत. ही पोलीस भरती अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी पोलीस मुख्यालयाच्या विविध ग्राऊंडवर ७० कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे पोलीस भरतीची प्रत्येक बाब टिपणार असल्याचे पोलीस अधॉीक्षक निखिल पिंगळे यांनी शहर पोलीस ठाण्यात घेतलेल्या पत्रपरिषदेत सांगितले.
 

गोंदिया जिल्हा पोलिस भरतीची संपूर्ण भरती प्रक्रिया गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या नेतृत्वात पोलीस मुख्यालय कारंजा, गोंदिया येथे १९ जून २०२४ रोजी सकाळी ५ वाजतापासून घेण्यात येणार आहे. ही पोलीस शिपाई भरती जवळजवळ १७ दिवस चालणार आहे. पोलिस शिपाई ११० जागांसाठी ८ हजार २६ अर्ज प्राप्त झाले आहेत. पोलीस मुख्यालय कारंजा गोंदिया येथे सर्वप्रथम महिला उमेदवारांची शारीरिक व मैदानी चाचणी प्रक्रिया घेण्यात येणार आहे. १६०० मीटर, ८०० मीटर, १०० मीटर, गोळा फेक, उंची, छाती मोजने संपूर्ण पोलीस भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकरीत्या व्हिडीओग्राफी, सीसीटीव्हीच्या निगराणीत होणार आहे. या भरतीसाठी जिल्हाभरातून पोलीस अधिकारी कर्मचारी मागविण्यात आले आहेत.
 

आमिष देणाऱ्यांचे नाव डायल ११२ वर सांगा
 

पोलीस भरती संदर्भात वशिला लागत असल्याच्या भूलथापा कुणी देत असेल तर त्या व्यक्तीचे नाव जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावे, पोलीस अधिक्षक गोंदियाच्या ई मेलवर किंवा डायल ११२ वर माहिती द्यावी. जेणेकरून त्या आमिष देणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्तेनुसार तात्पुरती निवड सूची तयार करण्यात येईल. तात्पुरत्या निवड सूचीमध्ये पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी केल्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांचाच निवड सूचीमध्ये समावेश केला जाईल. संपूर्ण पोलीस भरती प्रक्रिया ही पारदर्शकरित्या पार पाडण्यात येत आहे. गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे जनतेला तसेच भरती करिता येणारे उमेदवार, उमेदवारांचे पालक यांनी कुणाच्याही आमिषाला बळी पडू नये लगेच नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार करावी, असे पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी म्हटले आहे.
 

पोलीस भरतीच्या ११० जांगासाठी ८ हजार २६ उमेद्वारांचे अर्ज

जिल्हा पोलीस आस्थापनेवरील ११० पोलीस शिपाई पदभरतीसाठी ८ हजार २६ अर्ज आले आहेत. त्यात २ हजार ३७२ महिला, दोन तृतीयपंथी व ५ हजार ६५२ पुरूषांचे अर्ज आले आहेत. ज्या उमेदवारांना ज्या तारखेचे हॉल तिकीट प्राप्त झाले आहे त्यांना त्याच दिवशी प्रवेश देण्यात येणार आहे. कुठल्याही कारणाने, एकापेक्षा अधिक ठिकाणी अर्ज करणाऱ्या उमेद्वाराने कळवावे त्यानुसार त्यांचा चाचणीचा वेळ बदलवून देता येईल त्यासाठी अर्ज करावे.
 

अशी होईल शारीरिक मैदानी चाचणी
 

सर्वप्रथम उमेदवारांच्या प्रवेशपत्र स्वीकारणे नंतर उंची, छाती वजन मोजमाप, उंची, वजन, छाती मोजमाप यामध्ये पात्र उमेदवारांची शारीरीक मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. महिलांची मैदानी चाचणी नंतर पुरुष उमेदवाराकरीता १०० मीटर धावणे, १६०० मीटर धावणे, गोळा फेक व महिला उमेदवारांकरीता १०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे व गोळा फेक घेण्यात येईल.

Web Title: Gondia Recruitment under the watchful eye of Superintendent of Police 70 CCTV cameras 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस