व्यायामातून साधा ‘गुड मॉर्निंग’ : डॉ. जेकॉब जॉर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 09:06 PM2020-12-19T21:06:22+5:302020-12-19T21:14:36+5:30

‘Good Morning’ through Exercise सकाळी उठून नियमितपणे व्यायाम केला तर हृदयरोग, मधूमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, अल्झायमर, डिमेन्शियासारख्या आदी आजारांना दूर सारत खरे ‘गुड मॉर्निंग’ साधता येऊ शकते, असे मत केरळचे मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. जेकॉब जॉर्ज यांनी व्यक्त केले.

‘Good Morning’ through Exercise: Dr. Jacob George | व्यायामातून साधा ‘गुड मॉर्निंग’ : डॉ. जेकॉब जॉर्ज

व्यायामातून साधा ‘गुड मॉर्निंग’ : डॉ. जेकॉब जॉर्ज

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय मेंदू सप्ताहाचा दुसरा दिवस

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : सकाळी उठून नियमितपणे व्यायाम केला तर हृदयरोग, मधूमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, अल्झायमर, डिमेन्शियासारख्या आदी आजारांना दूर सारत खरे ‘गुड मॉर्निंग’ साधता येऊ शकते, असे मत केरळचे मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. जेकॉब जॉर्ज यांनी व्यक्त केले. ‘एक्सरसाइज अ‍ॅण्ड प्रिव्हेंशन ऑफ ब्रेन डिसॉर्डर्स’ या विषयावर ते बोलत होते.

इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीतर्फे १८ ते २४ डिसेंबर दरम्यान ‘राष्ट्रीय मेंदू सप्ताह’ाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. ‘माझे आरोग्य, माझी जबाबदारी’ ही या वषीर्ची संकल्पना आहे. चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी डॉ. सतीशकुमार (चेन्नेई), डॉ. जॉर्ज (कोत्तायम), डॉ. शांतला हेगडे (बंगलोर) हे सहभागी झाले होते. अध्यक्षस्थानी डॉ. सूर्यनारायण शर्मा आणि डॉ. अनुराधा होते.

नियमित व्यायाम केल्याने तणाव कमी होतो, झोप चांगली लागते, मूड चांगला राहतो आणि स्नायूंचे दुखणे कमी होते. मेंदूला रक्त पुरवठा होत असल्यामुळे अनेक आजारांपासून स्वत:चा बचाव करता येतो, अशी माहितीही डॉ. जॉर्ज यांनी दिली. डॉ. सतीशकुमार यांनी मुले, तरुण, ज्येष्ठ व गर्भवती महिलांना कसा आणि किती व्याायाम करावा याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, चालणे, धावणे, सायकलिंग, पोहणे, योग, ऐरोबिक्स यासारखे व्यायाम नियमित केल्यास आत्मविश्वास वाढतो. शरीराला ऊर्जा मिळते. स्टॅमिना वाढतो. ताण, नैराश्य कमी होते. योग्य आहार आणि नियमित व्यायामामुळे चेहºयावर तकाकी येते, असेही ते म्हणाले. डॉ. शांतला हेगडे म्हणाल्या, संगीत, शब्द, आवाज, नाद, रिदमच्या आवाजाचा मेंदूच्या वेगवेगळ्या भागावर प्रभाव पडतो.

या दरम्यान डॉ. मनिष महाजन यांनी संगीत आणि मेंदूच्या आरोग्यासंदभार्तील ‘आशायें’ हा व्हीडिओ सादर केला. प्रास्ताविक डॉ. सूर्यनारायण शर्मा यांनी केले. राष्ट्रीय संयोजक डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी संचालन आणि आभार प्रदर्शन केले.

Web Title: ‘Good Morning’ through Exercise: Dr. Jacob George

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.