प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: नागपूर मार्गे धावणाऱ्या सुरत-ब्रह्मपूर स्पेशलला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
By नरेश डोंगरे | Published: July 28, 2024 08:17 PM2024-07-28T20:17:39+5:302024-07-28T20:17:55+5:30
विशेष रेल्वेगाडीला मुदतवाढ देऊन आणखी २९ नोव्हेंबरपर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन मध्य रेल्वेनेनागपूर मार्गे धावणाऱ्या सूरत ब्रह्मपूर या विशेष रेल्वेगाडीला मुदतवाढ देऊन आणखी २९ नोव्हेंबरपर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
सूरत (गुजरात) मधून निघणारी ही गाडी भुसावळ, अकोला, नागपूर, रायपूर, टिटलागढ, विजयनगरम मार्गे ब्रह्मपूरला पोहोचते. उन्हाळ्यातील वाढलेली गर्दी नियंत्रित करण्याच्या हेतूने ही स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आली होती. जुलै अखेरपर्यंत चालविण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र उन्हाळाभर या गाडीत प्रवाशांची मोठी गर्दी होती. पावसाळ्यात ती तशीच असल्यामुळे ही गाडी बंद केल्यास प्रवाशांची गैरसोय होईल आणि या मार्गाने धावणाऱ्या अन्य रेल्वेगाड्यांमध्ये पुन्हा जास्त गर्दी वाढेल, हे ध्यानात आल्याने मध्य रेल्वेने सूरत-ब्रह्मपूर या विशेष रेल्वेगाडीला मुदतवाढ देऊन २९ नोव्हेंबरपर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, या विशेष रेल्वे गाडीचे आरक्षण २९ जुलैपासून सुरू होणार आहे.