रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी :१२० दिवसांपूर्वी आरक्षणाची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 08:16 PM2020-05-30T20:16:57+5:302020-05-30T20:19:51+5:30
रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार १ जूनपासून विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. १२ मेपासून चालविण्यात येणाऱ्या विशेष वातानुकूलित गाड्यांच्या व्यतिरिक्त या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी ३१ मेपासून ३० दिवसांऐवजी १२० दिवस आधी या गाड्यांचे आरक्षण करता येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार १ जूनपासून विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. १२ मेपासून चालविण्यात येणाऱ्या विशेष वातानुकूलित गाड्यांच्या व्यतिरिक्त या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी ३१ मेपासून ३० दिवसांऐवजी १२० दिवस आधी या गाड्यांचे आरक्षण करता येणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार ३१ मे रोजी सकाळी ८ वाजेपासून १२० दिवसानंतर असलेल्या रेल्वेगाडीचे तिकीट खरेदी करता येणार आहे. यापूर्वी केवळ ३० दिवसांपूर्वी तिकीट खरेदी करण्याची सवलत रेल्वे मंत्रालयाने दिली होती. याशिवाय या विशेष गाड्यात पार्सल आणि सामान बुक करण्याची परवानगीही देण्यात आली आहे. या गाड्यात फक्त पाकीटबंद वस्तू, खाण्यासाठी तयार असलेले भोजन, पाण्याच्या सीलबंद बॉटल्स, चहा, कॉफी या पदार्थांची तरतूद पेंट्री कारद्वारे किंवा व्हेंडरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. प्रवाशांनी या निर्णयाची नोंद घेऊन आपले आरक्षण करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.