वस्तू व सेवा कर कर्मचारी संपात सहभागी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:22 AM2020-11-26T04:22:38+5:302020-11-26T04:22:38+5:30
सर्वांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करा, खासगीकरण रद्द करा, नवीन कामगार कायदे रद्द करा, केंद्राप्रमाणे वेतन व ...
सर्वांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करा, खासगीकरण रद्द करा, नवीन कामगार कायदे रद्द करा, केंद्राप्रमाणे वेतन व भत्ते द्या, रिक्त पदे तात्काळ भरा, बेरोजगार भत्ता द्या, वेतनत्रुट्या दूर करा, बक्षी समितीचा दुसरा खंड जाहीर करा, कृषी कायदे मागे घ्या, सर्वांना आरोग्य सुविधा उपलब्ध करा इत्यादी मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्षवेध करण्याकरिता एक दिवस २६ नोव्हेंबरला संपावर जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वस्तू व सेवा कर कर्मचारी संघटना नागपूरचे अध्यक्ष श्रीकृष्ण झाडोकर व सचिव राजेश पारेकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरुद्धच्या संपात सहभागी होण्याचे आवाहन केले. सर्वांनी संपात सहभागी होण्याचे मान्य केले. सरदेशपांडे यांनी आभार मानले. सभेसाठी वरठी, घरडे, देरकर, जीवतोडे, अतुल पाटील. प्रीती मडकवार, राऊत यांनी परिश्रम घेतले.