नागपुरात शस्त्रांसह गुंडांचा हल्ला : दाम्पत्यासह तिघांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:41 AM2019-07-11T00:41:31+5:302019-07-11T00:42:31+5:30

कळमन्यातील झाडे ले-आऊट येथे शस्त्रासह सज्ज असलेल्या गुंडांनी हल्ला करून दोन कुटुंबांना लुटले. गुंडांच्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला. मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.

Goons attack with arms in Nagpur: Three robbed including couple | नागपुरात शस्त्रांसह गुंडांचा हल्ला : दाम्पत्यासह तिघांना लुटले

नागपुरात शस्त्रांसह गुंडांचा हल्ला : दाम्पत्यासह तिघांना लुटले

googlenewsNext
ठळक मुद्देकळमन्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमन्यातील झाडे ले-आऊट येथे शस्त्रासह सज्ज असलेल्या गुंडांनी हल्ला करून दोन कुटुंबांना लुटले. गुंडांच्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला. मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.
झाडे ले-आऊटमध्ये अशोक पटले नावाचा व्यक्ती राहतो. पटले सेंट्रींगचे काम करतो. असे सांगितले जाते की, काही दिवसांपूर्वी पटले यांचा काही लोकांशी वाद झाला होता. दोन्ही पक्षात मारहाण आणि शिवीगाळही झाली होती. यानंतर पटले कुटुंबासह दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले. मंगळवारी रात्री शस्त्रांनी सज्ज चार ते पाच आरोपी परिसरात आले. ते पटलेबाबत विचारपूस करू लागले. ते वस्तीतील लता नागपुरे यांच्या घरी गेले. लता आणि त्यांच्या पतीने पटले यांच्याबाबत कुठलीही माहिती नसल्याचे सांगितले. यावर आरोपी संतापले. त्यांनी मारहाण केली. चाकूचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि पतीचा मोबाईल हिसकावून नेला. नागपुरे दाम्पत्यास लुटल्यानंतर आरोपी शेजारी राहणाऱ्या शेख सलीम शेख चांदमिया यांच्या घरी गेले. त्यांनाही पटले यांच्याबाबत विचारपूस केली. सलीम यांनीही माहिती नसल्याचे सांगितले. यावर आरोपी आणखी संतापले. त्यांनी सलीमवर चाकूने हल्ला करून जखमी केले आणि लुटले. यानंतर पटले यांच्या घरी जाऊन तोडफोड केली. यामुळे लोक जमा झाले. आरोपी लोकांना जीवे मारण्याची धमकी देऊन फरार झाले. या घटनेमुळे लोकांमध्ये दहशत पसरली आहे. कळमना पोलिसांनी सूचना मिळताच आरोपीविरुद्ध लुटमार, मारहाण, धमकावण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Goons attack with arms in Nagpur: Three robbed including couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.