‘मै हू डॉन’ म्हणत तरुणांना मारहाण, दुचाकीदेखील पळविली

By योगेश पांडे | Published: April 3, 2023 02:30 PM2023-04-03T14:30:43+5:302023-04-03T14:31:45+5:30

भर रस्त्यावर गुंडांची ‘भाईगिरी’ : न्यू कैलासनगरात दहशत

goons beat up the youth saying 'Mai Hu Don' and ran away the bike in nagpur | ‘मै हू डॉन’ म्हणत तरुणांना मारहाण, दुचाकीदेखील पळविली

‘मै हू डॉन’ म्हणत तरुणांना मारहाण, दुचाकीदेखील पळविली

googlenewsNext

नागपूर : अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडांची दहशत वाढत असून तीन तरुणांनी गुंडगिरी करत दोन तरुणांना मारहाण करत दुचाकी पळविली. आश्चर्याची बाब म्हणजे मी परिसरातील डॉन असून तुरुंगातून बाहेर आलो आहे, असे म्हणत तरुणांना धमकी देण्यात आली. या प्रकारामुळे कैलासनगर भागात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आतापर्यंत केवळ एकाच गुंडाला अटक केली आहे.

१ एप्रिल रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास रजत पंधराम (२३, न्यू कैलासनगर, अजनी) हा त्याचे मित्र यश तायडे व सागर बावनकर यांच्यासोबत घराजवळ बोलत होता. त्याच्याजवळ दुचाकीदेखील होती. त्याचवेळी हर्ष देविदास क्षीरसागर (२०), अभय बागेश्वर (२२) व शुभम चौधरी (२५) हे तेथे आले. न्यू कैलासनगर मध्ये राहणाऱ्या या आरोपींच्या हातात लाकडी दांडे होते. त्यांनी रजत व त्याच्या मित्रांना ‘आम्हाला ओळखता का’ असे विचारले. रजतने नाही म्हटल्यावर तिघेही संतापले व आम्ही या भागातील डॉन असून तुरुंगातून शिक्षा भोगून बाहेर आलो आहे. तुम्ही आम्हाला ओळखत कसे नाही, असे म्हणत त्यांनी लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.

आरोपी हर्षने रजतला खाली पाडून त्याच्या खिशातील पंधराशे रुपये रोख हिसकावून घेतले. तर अभय व शुभम या आरोपींनी यश व सागरला मारहाण करू दुचाकीची चाबी हिसकावत पळ काढला. या प्रकारानंतर रजतने मेडिकल इस्पितळात जाऊन उपचार केले व दुसऱ्या दिवशी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला व आरोपी हर्ष याला अटक केली. तर अभय बागेश्वर व शुभम चौधरी फरार आहेत

Web Title: goons beat up the youth saying 'Mai Hu Don' and ran away the bike in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.