नागपूरच्या वनपरिक्षेत्रातील गोरेवाडा जंगल पुन्हा पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 10:10 AM2018-03-26T10:10:47+5:302018-03-26T10:10:55+5:30

गोरेवाडा वन परिक्षेत्रात रविवारी दुपारी पुन्हा आग लागली. यावेळी ही आग गोरेवाडा तलावाला लागून असलेल्या वॉटर फिल्टर प्लाँटजवळील जंगलाला आग लागली.

The Gorevada jungle in the forest area of ​​Nagpur caught by fire | नागपूरच्या वनपरिक्षेत्रातील गोरेवाडा जंगल पुन्हा पेटले

नागपूरच्या वनपरिक्षेत्रातील गोरेवाडा जंगल पुन्हा पेटले

googlenewsNext
ठळक मुद्देहिंगणा रेंजमध्येही लागली आग नागरिकात भीतीचे वातावरण व्यापक उपाययोजना कधी ?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरेवाडा वन परिक्षेत्रात रविवारी दुपारी पुन्हा आग लागली. यावेळी ही आग गोरेवाडा तलावाला लागून असलेल्या वॉटर फिल्टर प्लाँटजवळील जंगलाला आग लागली. आगीचा धूर पाहून परिसरातील लोक इमारतीच्या छतावर चढून पाहू लागले. दुपारी ४ वाजता अग्निशमन दलला या आगीची सूचना मिळली. यानंतर एक गाडी जंगलाकडे रवाना झाली. ही आग किती क्षेत्रात पसरली होती, याची माहिती मात्र मिळू शकली नाही. यासंबंधात गोरेवाडा वन अधिकाऱ्यांशीही संपर्क होऊ शकला नाही. गोरेवाडा जंगलात यापूर्वीही अनेकदा आगीच्या घटना घडलेल्या आहेत. यापूर्वी काटोल रोडच्या दिशेने असलेल्या वनक्षेत्राला आग लागली होती. येथे सध्या जंगल सफारी व कार्यालयाच्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे. परंतु फिल्टर प्लाँटच्या दिशेने पहिल्यांदाच आग लागली. याशिवाय हिंगणा वनक्षेत्राला लागून असलेल्या चनकापूर (नेरी) परिसरातील महसूल विभागाच्या झुडपी जागेतही रविवारी दुपारी आग लागली. शनिवारी दुपारीसुद्धा या परिसरात आग लागल्याचे सांगितले जाते.

Web Title: The Gorevada jungle in the forest area of ​​Nagpur caught by fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.