गोरेवाडा की ‘मरण’वाडा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 01:22 AM2017-08-07T01:22:21+5:302017-08-07T01:30:25+5:30

पिण्याच्या पाण्यात मटणाचा रस्सा टाकला तर तुम्हाला आवडेल का ? त्यात बोट्या (हाड) टाकल्यावर पाण्यात त्याचा अर्क उतरणार नाही का ?

Gorewada ki 'death' wada? | गोरेवाडा की ‘मरण’वाडा?

गोरेवाडा की ‘मरण’वाडा?

Next
ठळक मुद्देपिण्याच्या पाण्यात मटणाचा रस्सा, बोट्याहीमस्तवाल तरुणांचा तलावात धिंगाणापाण्यावर तरंगताहेत दारूच्या बाटल्यालव्हर्स स्पॉट, जंगलात कंडोमअवैध मासेमारी वन्यजीव धोक्यातनागपूरकर किती सुरक्षित ?

जितेंद्र ढवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पिण्याच्या पाण्यात मटणाचा रस्सा टाकला तर तुम्हाला आवडेल का ? त्यात बोट्या (हाड) टाकल्यावर पाण्यात त्याचा अर्क उतरणार नाही का ? हेही सोडा कुणी लघवी केलेले पाणी तुम्ही प्याल का ? श्रावणमास पाळणारे असे पाणी पितात का ? पण हे पाणी तुम्ही आम्ही सर्व पितोय. केवळ ते जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून पुरविले जाते या विश्वासावर.
वेणा डॅम आणि वाकीत दहा तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकमत चमूने उपराजधानीला पाणीपुरवठा करणाºया गोरेवाडा तलावाची रविवारी पाहणी केली असता भीषण वास्तव पुढे आले. गोरेवाडा तलावाच्या प्रवेशद्वारावर ‘प्रतिबंधित क्षेत्र’ असा मोठा फलक लावण्यात आला आहे. मात्र हा फलक आणि तेथील सुरक्षा व्यवस्था भेदून गोरेवाडा तलावात मस्तवाल तरुणांचा जो धिंगणा चालतो ते पाहता वेणा आणि वाकीसारख्या घटना का घडतात याचे उत्तर मिळते.
लोकमत प्रतिनिधीने सुरक्षा प्रवेशद्वारातून गोरेवाडा तलावातील प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश घेतला. मात्र तिथे तैनात असलेला सुरक्षा रक्षक पाय लांब करून आराम करीत असल्याचे दिसून आले. प्रस्तुत प्रतिनिधीने आधी गोरेवाड्याच्या जुन्या बगिच्यात प्रवेश घेतला. यात बाईकस्वार तरुण तरुणीसोबत गार्डनचा फेरफटका मारत असल्याचे दिसून आले. प्रकरण एवढ्यावर थांबत नाही ब्रिटिशकालीन जलशुद्धीकरण केंद्राच्या कार्यालयाजवळ चक्क आठ ते दहा तरुण भाजी शिजवित होते.

तलाव माथ्यावर बाईक रायडिंग
प्रतिबंधित क्षेत्रात सर्वच गोष्टींना प्रतिबंध असतो. मात्र गोरेवाडा तलावाच्या माथ्यावर कुणालाही कसलाही प्रतिबंध नाही. तलावाच्या माथ्यावर तरुणांची जोरदार बाईक रायडिंग चालते. जरासा जरी तोल गेला की बाईक आणि तरुण तलावात जातील. असे हे चित्र असते. मात्र जोशात आलेल्या या तरुणांना मृत्यूची परवा कुठे आहे.

हे काय चाललय...
गोरेवाड्याचा आंतररराष्ट्रीय स्तरावर विकास करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. मात्र गोरेवाडा तलाव आणि जंगल क्षेत्र सध्या प्रेमीयुगलाचा स्पॉट झाला आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात मद्यधुंद तरुणांचा धिंगणा सुरू होता. त्याच क्षेत्रात एक तरुणी आपल्या मित्रासोबत तलावाचा फेरफटका मारत होती. तिच्याकडे बिघणाºया विखारी नजरा आणि त्यांचे संवाद किळसवाणे होते. अशात या मुलीसोबत काही विपरीत घडले तर याची जबाबदारी कोण घेणार ? इतकेच काय जंगल परिसरात कंडोमचे पॅकेटही पडलेले दिसून आले. त्यामुळे जंगल आणि तलावाची सुरक्षा किती चोख आहे याचा अंदाज तुम्हाला लावणे शक्य होईल.

हे मागताहेत मरण?
गोरेवाडा तलाव हा पोहण्याचा तलाव नाही. या तलावात प्रतिबंधित क्षेत्रात पोहायला गेलेले अनेक तरुण बुडालेले आहे. दहा वर्षांपूर्वी अशा अनेक घटना येथे घडल्या आहे. मात्र तलावाच्या उजव्या बाजूला जिथे प्रचंड धोका आहे. अशा ठिकाणी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सहा तरुण पोहतांना दिसून आले. या तलावात असलेला भवरा आणि मोठ्या खेकड्यामुळे अनेक जणांना जलसमाधी मिळाली आहे. त्यामुळे हे तरुण मरण मागताहेत का, असा प्रश्न पडतो.

 








 

Web Title: Gorewada ki 'death' wada?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.