इंडियन सफारी घडविणार गोरेवाडाची वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:08 AM2021-01-25T04:08:30+5:302021-01-25T04:08:30+5:30

नागपूर : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील इंडियन सफारीला २६ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. पर्यटनाच्या दृष्टीने उपराजधानीचा लौकिक वाढिवणाऱ्या या ...

Gorewada Wari to host Indian Safari | इंडियन सफारी घडविणार गोरेवाडाची वारी

इंडियन सफारी घडविणार गोरेवाडाची वारी

Next

नागपूर : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील इंडियन सफारीला २६ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. पर्यटनाच्या दृष्टीने उपराजधानीचा लौकिक वाढिवणाऱ्या या प्रकल्पातील इंडियन सफारीच्या माध्यमातून पर्यटकांची आणि वन्यजीवप्रेमींची गोरेवाड्याची वारी या निमित्ताने सुरू होत आहे.

१,९४१ हेक्टर क्षेत्रफळ असलेला हा विस्तीर्ण प्रकल्प काटोल नाका ते फेट्रीपर्यंत पसरला आहे. यात ५६४ हेक्टर क्षेत्रावर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय उभारले जात आहे. येथील २५ टक्के काम पूर्ण झाल्याने इंडियन सफारीला प्रारंभ होत आहे. उर्वारित ७५ टक्के काम झाल्यावरच गोरेवाडाचे खरे आंतरराष्ट्रीय रूप प्रकटणार आहे.

राज्य शासनाने या प्रकल्पासाठी २००६ मध्ये जागा निर्धारण केले होते. गोरेवाडा तलावालगतच्या १,९४१ हेक्टर क्षेत्रफळाच्या जंगलाची यासाठी निवड झाली होती. वनसंवर्धन कायद्याच्या मंजुरीनंतर डिसेंबर-२०१७ मध्ये प्राणिसंग्रहालयाच्या बांधकामाला सुरुवात झाली. १० मार्च २०१९ ला या केंद्रीय प्राणिसंग्रहालयाला प्राधिकरणाकडून ब्रृहद विकास आराखड्याला मंजुरी मिळाली. इंडियन सफारीला मंजुरी देण्याचा प्रस्ताव १२ ऑगस्ट २०१९ ला राज्य शासनाने वन-पर्यावरण मंत्रालयाला पाठविला होता. त्यानंतर हवामान बदल मंत्रालयाने प्राणिसंग्रहालय सुरू करण्यासाठी ३० ऑगस्ट २०१९ ला मंजुरी दिली होती.

...

अशी असेल इंडियन सफारी

इंडियन सफारी १४५ हेक्टरमध्ये असेल. वनविभागाने यासाठी गोरेवाडामध्ये पाच प्रजातींचे ३३ प्राणी सोडले आहेत. यात एक वाघ-वाघिणीची जोडी, सात बिबट (दोन नर आणि पाच मादी), सहा अस्वल (नर-मादी प्रत्येकी तीन), १४ निलगायी आणि चार चितळांचा समावेश आहे. वन्यजीव प्राधिकरणाच्या परवानगीनंतर या प्राण्यांना येथे सोडण्यात आले आहे. या सर्व प्राण्यांसाठी स्वतंत्र एक्सपोजर्स आहेत. वाघ, बिबट आणि अस्वलींसाठी २५ हेक्टर क्षेत्रफळाचे तर तृणभक्षी प्राण्यांसाठी ४०हेक्टर क्षेत्रफळाचे असून एकूण ११५ हेक्टरचे एक्सपोजर्स उभारण्यात आले आहेत.

...

गोरेवाडा प्रकल्पाची वैशिष्ट्ये

या प्रकल्पामध्ये इंडियन सफारी १४५ हेक्टर क्षेत्रात असेल. प्राण्यांसाठी स्वतंत्र एक्सपोजर्स असतील. नाईट सफारी ४५ हेक्टर क्षेत्रात, आफ्रिकन सफारी ९० हेक्टर, बायो पार्क ३० हेक्टर, बर्ड पार्क ७ हेक्टर, जलाशय २० हेक्टर, प्रवेशद्वार १६.५ हेक्टर क्षेत्र असे नियोजन करण्यात आले आहे. यासोबतच प्राणी उपचार केंद्र, पर्यटकांसाठी प्रसाधनगृह अशी उभारणी करण्यात आली आहे.

...

Web Title: Gorewada Wari to host Indian Safari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.