इंडियन सफारी घडविणार गोरेवाड्याची वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:08 AM2021-01-25T04:08:33+5:302021-01-25T04:08:33+5:30
... १८३.६३ कोटीतृून कामे गोरेवाडा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामे १८३.६३ कोटी रुपयामधून झाली आहेत. हा निधी राज्य सरकारकडून २०१७ ...
...
१८३.६३ कोटीतृून कामे
गोरेवाडा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामे १८३.६३ कोटी रुपयामधून झाली आहेत. हा निधी राज्य सरकारकडून २०१७ मध्ये मिळाला होता. त्यातून सुरक्षा भिंत, अंतर्गत मार्ग, रेस्क्यू सेंटर, इंडियन सफारी, तलाव दुरुस्ती अशी कामे झाली आहेत.
...
वर्षाला ५५ कोटीचे उत्पन्न
आराखड्यानुसार, या प्रकल्पाला वर्षभरात २७ ते ३० लाख पर्यटक भेटी देतील, असा अंदाज आहे. त्यातून ५५ कोटी रुपयाचे उत्पन्न मिळणार असून, ४० कोटीचा खर्च गृहित धरण्यात आला आहे. माफसूचे तज्ज्ञ डॉक्टर येथील प्राण्यांची देखरेख करतील. माफसूचे विद्यार्थीही येथे प्राण्यांचे अध्ययन करतील.
...
उभारणी सिंगापूर ॲनिमल पार्कच्या धर्तीवर
नागपूर शहरापासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोरेवाडा प्रकल्पाची उभारणी सिंगापूरच्या ॲनिमल पार्कच्या धर्तीवर करण्यात आली आहे. नाईट सफारी असलेले देशातील हे पहिले प्राणिसंग्रहालय असेल. केवळ देशातच नव्हे तर विदेशातही या प्रकल्पाचे ब्रँडिंग केले जाणार आहे.
...