गोरेवाडा सुरू होणार, महाराजबागेबद्दल निर्णय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:07 AM2021-06-21T04:07:13+5:302021-06-21T04:07:13+5:30
नागपूर : शहरात आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची घटत चाललेली संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने गोरेवाडा जंगल सफारी सुरू करण्यास परवानगी ...
नागपूर : शहरात आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची घटत चाललेली संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने गोरेवाडा जंगल सफारी सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे २२ जूनपासून गोरेवाडा प्रशासन पर्यटकांसाठी येथील गेट खुुले करणार आहे.
प्रशासनाच्या निर्णयानुसार, मंगळवारी सकाळी ८.३० वाजता गोरेवाडातील जंगल सफारी सुरू केली जाईल. मात्र प्रत्येक सोमवारी येथील पर्यटन बंद असेल. एकीकडे गोरेवाडातील जंगल सफारी सुरू करण्याचा निर्णय झाला असताना महाराजबाग प्राणिसंग्रहालयदेखील सुरू होणार का, याबद्दल अनिश्चितता आहे. प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनातील अधिकारी या संदर्भात जिल्ह्याधिकाऱ्यांशी चर्चा करतील, त्यानंतरच हे स्पष्ट होणार आहे.
...
मॉर्निंग वॉकर्ससाठी जपानी गार्डन सुरू
वन विभागाच्या सेमिनरी हिल्सवरील जपानी गार्डन आणि बालोद्यानसुद्धा सकाळी ६ ते ९ या वेळेत मॉर्निंग वॉकर्सकरिता उघडले जाणार आहेत. हे दोन्ही उद्यान दिवसभर सुरू ठेवण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही.
....