दिवाळीत नागपूरला मिळाले दुपारचे विमान
By मोरेश्वर मानापुरे | Updated: November 9, 2023 20:24 IST2023-11-09T20:23:42+5:302023-11-09T20:24:13+5:30
त्यानंतर ही सेवा पुन्हा बंद होईल.

दिवाळीत नागपूरला मिळाले दुपारचे विमान
मोरेश्वर मानापुरे, नागपूर : एअर इंडियाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईकरिता आणखी एक विमान मिळाले आहे. हे विमान केवळ दिवाळीकरिता आहे. ही सेवा २९ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून २९ नोव्हेंबरपर्यंत उड्डाण सुरू राहील. त्यानंतर ही सेवा पुन्हा बंद होईल.
एआय १६१४/१६१३ विमान मुंबई-नागपूर-मुंबई असे आहे. सकाळी १०.४० वाजता मुंबईहून रवाना होते आणिि नागपुरातून दुपारी १२.४५ वाजता मुंबईकडे उड्डाण भरते. ही विमान सेवा चार महिन्यांपासून बंद होती. सण आणि पर्यटनाच्या दृष्टीने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मागणीनंतर दुपारची विमान सेवा मिळाली आहे. पण ही सेवा केवळ एक महिनाच सुरू राहील. एअर इंडियाची रात्रीची एआय ६२९/६३० मुंबई-नागपूर-मुंबई विमानसेवा नियमित सुरू आहे.