कोविड योद्धा यांच्या कुटुंबीयांना सरकारतर्फे मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:08 AM2020-12-29T04:08:03+5:302020-12-29T04:08:03+5:30
नागपूर : कोरोना साथीच्या काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या दोन दिवंगत योद्धा यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून ...
नागपूर : कोरोना साथीच्या काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या दोन दिवंगत योद्धा यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून आज प्रत्येकी ५० लाखाचा सानुग्रह सहाय्यता निधी (विमा कवच) देण्यात आला. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत, पदुम व क्रीडामंत्री सुनील केदार, जि.प. अध्यक्षा रश्मी बर्वे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे प्रामुखाने उपस्थित होते. पंचायत समिती नागपूर येथील विस्तार अधिकारी दिलीप कुहीटे व डिगडोह ग्रामपंचायतचे कर्मचारी मस्जिद शेख यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांचे वाारस अर्चना कुहीटे व आशिया मस्जिद शेख यांना सानुग्रह निधीचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत राजेंद्र भुयार उपस्थित हाेते.