शासकीय कर्मचारी लाच प्रकरणात दोषी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:32 AM2018-03-28T00:32:08+5:302018-03-28T00:32:29+5:30
सत्र न्यायालयाने शासकीय कर्मचारी अनिल हेमचंद्र गवई यांना लाचलुचपत प्रकरणात दोषी ठरवून एक वर्ष कारावास व १००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांनी मंगळवारी हा निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने शासकीय कर्मचारी अनिल हेमचंद्र गवई यांना लाचलुचपत प्रकरणात दोषी ठरवून एक वर्ष कारावास व १००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांनी मंगळवारी हा निर्णय दिला.
घटनेच्या वेळी गवई शासकीय निरीक्षण गृहातील परिविक्षाधीन अधिकारी कार्यालयात कर्तव्यावर होते. फिर्यादी हरी झोडे यांच्या मुलाला रिमांड होममध्ये दाखल करण्याच्या आदेशाची प्रत देण्यासाठी गवई यांनी ५०० रुपयांची लाच मागितली होती असे सरकारी पक्षाचे म्हणणे आहे. या आरोपाखाली गवई यांना ६ जून २००९ रोजी अटक करण्यात आली होती. तसेच, जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक ए. व्ही. करमरकर यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. जी. एन. दुबे यांनी बाजू मांडली.