सरकारला 'ताई'च्या साडीचा विसर;  शासनाकडून निधी अप्राप्त असल्याने वाटप झाले नाही

By गणेश हुड | Published: May 13, 2023 05:28 PM2023-05-13T17:28:44+5:302023-05-13T17:29:10+5:30

Nagpur News २०२१-२२ या वर्षात अंगणवाडी ताई आणि मदतनीस यांच्या साडीसाठी पैसे  जिल्ह्याला आले होते. मात्र २०२२-२३ या वर्षात शासनाकडून निधी अप्राप्त असल्याने 'ताई'ला साडी मिळालेली नाही.

Government forgets 'Tai's' saree; Due to non-receipt of funds from the government, no distribution was made | सरकारला 'ताई'च्या साडीचा विसर;  शासनाकडून निधी अप्राप्त असल्याने वाटप झाले नाही

सरकारला 'ताई'च्या साडीचा विसर;  शासनाकडून निधी अप्राप्त असल्याने वाटप झाले नाही

googlenewsNext

गणेश हूड
नागपूर :  पोषण अभियान या केंद्र पुरस्कृत पोषण अभियानांतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रांमधील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रत्येकी २ संच हातमाग साड्या उपलब्ध केल्या जातात.अंगणवाडी  सेविका व मदतनीस यांना साड्या घेण्याकरिता  प्रति साडी ४०० रुपये  प्रमाणे २ साड्यांकरिता ८०० रुपये  त्यांच्या बँक खात्यामध्ये  हस्तांतरित जातात. २०२१-२२ या वर्षात अंगणवाडी ताई आणि मदतनीस यांच्या साडीसाठी पैसे  जिल्ह्याला आले होते. मात्र २०२२-२३ या वर्षात शासनाकडून निधी अप्राप्त असल्याने 'ताई'ला साडी मिळालेली नाही.
नागपूर  जिल्हयात २२१२ अंगणवाडी सेविका व २२१२ अगणवाडी मदतनीस अशा एकूण ४४२४ ताई व मदतनीस आहेत.  मात्र मागील वर्षात त्यांना साडीसाठी शासनाकडून पैसे मिळालेले नाही. आर्थिक वर्ष संपल्याने हा निधी मिळणार की नाही. याबाबत अधिकाऱ्यांना माहिती नाही.

निधी अप्राप्त असल्याने वाटप झाले नाही
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना साड्या घेण्याकरिता  प्रति साडी ४०० रुपये  प्रमाणे २ साड्यांकरिता ८०० रुपये  अंगणवाडी कर्मचा-यांच्या बँक खात्यामध्ये  हस्तांतरित जातात. मात्र २०२२-२३ या वर्षात शासनाकडून निधी अप्राप्त असल्याने रक्कम देता आलेली नाही. शासनाकडून निधी प्राप्त होताच वाटप केले जाईल.
-बी.जी.तांबे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी,जि.प.

Web Title: Government forgets 'Tai's' saree; Due to non-receipt of funds from the government, no distribution was made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार