राज्यातील शासकीय हरित इमारतींचे होणार मानांकन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 05:53 AM2020-11-02T05:53:31+5:302020-11-02T05:53:52+5:30
Ashok Chavan : सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ३०० इमारतींचे एनर्जी ऑडिट पूर्ण झालेले असून, अस्तित्वातील इमारतींना हरित इमारती मूल्यांकन प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हरित इमारत संकल्पनेनुसार राज्यातील विविध विभागाच्या शासकीय इमारतींचे बांधकाम करण्यात येत आहे. या इमारतींचे आता संगणक प्रणालीद्वारे मानांकन होणार आहे. त्यासाठी बांधकाम विभागच्या नागपूर विभागाने विकसित केलेल्या ‘गिरी या विशिष्ट संगणक प्रणालीचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते रविवारी नागपुरात करण्यात आले.
३०० इमारतींचे एनर्जी ऑडिट पूर्ण : सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ३०० इमारतींचे एनर्जी ऑडिट पूर्ण झालेले असून, अस्तित्वातील इमारतींना हरित इमारती मूल्यांकन प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तसेच १६८ नवीन इमारतींचे हरित इमारती मूल्यांकन करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अजित सगणे यांनी दिली.