सरकार कायद्याचा गैरवापर करतंय, शत्रुवरही अशी वेळ येऊ नये; संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 04:13 PM2022-12-30T16:13:39+5:302022-12-30T16:19:50+5:30
आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकार कायद्याचा गैरवापर करत आहे.
आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकार कायद्याचा गैरवापर करत आहे, शत्रुवरही अशी वेळ येऊ नये. सत्ताधारी अमानुष वागत आहेत, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केला.
अनिल देशमुख हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते, त्यांनी अनेक मोठ्या नेत्यांसोबत काम केले आहे. विदर्भात त्यांनी नेतृत्व केले आहे. ज्या पद्धतीने मला, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावर सत्तेचा गैरवापर केला. पण, आम्ही कायद्याची लढाई करुन घरी पोहोचलो. कायदा काय सांगतो दहशतवादी निर्माण करणाऱ्यांसाठी हा कायदा केला. असा प्रसंग आमच्यावर आला, त्यावेळी आमच्या कुटुंबावर कशी वेळ आली असेल सांगू शकत नाही. अशी वेळ शत्रुवरही येऊ नये, असं खासदार संजय राऊत म्हणाले.
'अनिल देशमुख यांच्या जामीनावेळी न्यायालयाने जे निरिक्षण नोंदवले आहे, ते महत्वाच आहे. माझ्या जामीनावेळी जी निरिक्षण केली तीही महत्वाची आहेत. सध्या सत्ताधारी अमानूष वागत आहेत, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
'अनिल देशमुख ज्या संकटातून गेले आहेत. त्या संकटातून मीही गेलो आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा सातत्याने गैरवापर सुरू आहे. अनिल देशमुखांची कारकीर्द निष्कलंक आहे. सरकार कायद्याचा गैरवापर करत आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
१३ महिन्यांनी सुटका
माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर १३ महिने २७ दिवसांनी आर्थर रोड कारागृहातून बाहेर आल्यानंतर दिग्गज नेतेमंडळींच्या उपस्थितीत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी देशमुख यांनी आपल्याला खोट्या आरोपात फसवण्यात आल्याचा आरोप केला. मात्र, न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे स्पष्ट करत त्यांनी सर्वांचे आभार मानले.
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुली आरोपावरून देशमुख यांना गेल्या वर्षी १ नोव्हेंबर रोजी ईडीने अटक केली. काही दिवसांपूर्वीच त्यांना जामीन मंजूर झाला होता. मात्र, त्यावर सीबीआयने आक्षेप घेतल्याने त्यांकारागृहातला मुक्काम वाढला. अखेर त्यांना जामीन मंजूर झाल्याने बुधवारी सायंकाळी ५ वाजता देशमुख यांची कारागृहातून सुटका झाली.