बालमजुरीबाबत शासकीय यंत्रणाच उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 11:41 PM2018-06-11T23:41:14+5:302018-06-11T23:42:41+5:30
बालमजुरी हा आपल्या देशाला लागलेला कलंक आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. कारण जगात सर्वाधिक बालमजूर भारतात सापडतात, हे वास्तव आहे. नागपूर शहरातही आपल्याला विविध ठिकाणी बालमजूर काम करताना सरास नजरेस पडतात. गरिबी आणि घराची आवश्यकता म्हणून नाईलाजास्तव लहान वयातच मुलांना मजुरी करणे भाग पडते त्यामुळे त्यांचे बालपण, शिक्षण हिरावले जाते. यातून अनेक सामाजिक प्रश्नही निर्माण होतात. यामुळे बालमजुरीच्या समूळ उच्चाटनासाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. शासनाच्या विविध योजनाही आहे. तरीही बालमजुरी कायम आहे. कारण कायदे असले तरी त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा मात्र उदासीन आहे. आता तर कायदाच लंगडा करण्यात आल्याने बालमजुरीचे निर्मूलन होणार तरी कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बालमजुरी हा आपल्या देशाला लागलेला कलंक आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. कारण जगात सर्वाधिक बालमजूर भारतात सापडतात, हे वास्तव आहे. नागपूर शहरातही आपल्याला विविध ठिकाणी बालमजूर काम करताना सरास नजरेस पडतात. गरिबी आणि घराची आवश्यकता म्हणून नाईलाजास्तव लहान वयातच मुलांना मजुरी करणे भाग पडते त्यामुळे त्यांचे बालपण, शिक्षण हिरावले जाते. यातून अनेक सामाजिक प्रश्नही निर्माण होतात. यामुळे बालमजुरीच्या समूळ उच्चाटनासाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. शासनाच्या विविध योजनाही आहे. तरीही बालमजुरी कायम आहे. कारण कायदे असले तरी त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा मात्र उदासीन आहे. आता तर कायदाच लंगडा करण्यात आल्याने बालमजुरीचे निर्मूलन होणार तरी कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागपूर शहरात अनेक ठिकाणी चहाच्या टपऱ्यांवर, ढाब्यांवर, सोनार ओळीत, किराणा ओळीत, भांडेवाडीत कचरा वेचताना, अगरबत्ती उद्योग, वरातीसमोर दिवे घेऊन चलणारे, पतंग व्यवसाय, पूजेचे नारळ तयार करणे, झालर व दरवाजाचे तोरण तयार करणे, काचपत्रे शिशा, लोखंड गोळा करणे, बांधकाम आदी ठिकाणी आपल्याला अनेक छोटू नावाचे बालमजूर आढळून येतात. या बालमजुरांबाबत मालकाकडे विचारणा केली तर यांच्या भरवशावरच त्यांचे घर चालते? असे उत्तर मिळते. ही बाब काही प्रमाणात खरीही असते. पालकांना विचारले तर वेगळाच सूर असतो. दिवसभर इकडे-तिकडे फिरण्यापेक्षा दोन पैसे घरात आले तर चांगलेच आहे, असे सांगितले जाते.
नागपुरातील असंघटित कामगारांचे नेते हरीश धुरट यांनी दिलेली माहिती तर अतिशय धक्कादायक अशी आहे. गेल्या दोन वर्षांपासून बालमजुरी याकडे कुणाचेच लक्ष नाही. ना शासन याबाबत काही बोलायला तयार आहे ना प्रशासनाकडे यासाठी वेळ आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणानुसार नागपूर शहरात तब्बल ३० हजारावर बालमजूर आहेत. त्यांच्या निर्मूलनासाठी कायदे होते. परंतु आता कायदाच लंगडा करण्यात आलेला आहे. बालमजुरी निर्मूलन कायद्यानुसार तक्रारीनुसार एखाद्या हॉटेल किंवा प्रतिष्ठानावर धाड टाकली किंवा निरीक्षण केले आणि त्या ठिकाणी मजुरी करताना एखादा बालक आढळून आल्यास त्याच ठिकाणी मालकाला २५ हजार रुपये दंड भरावा लागत असे.