‘सुंदर माझे कार्यालय’ अभियानातून शासकीय कार्यालये चकाकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:12 AM2021-09-08T04:12:25+5:302021-09-08T04:12:25+5:30
नागपूर : ‘सुंदर माझे कार्यालय’ या अभियानाच्या माध्यमातून विभागातील शासकीय कार्यालये चकाकतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कार्यालयांची कार्यसंस्कृती ...
नागपूर : ‘सुंदर माझे कार्यालय’ या अभियानाच्या माध्यमातून विभागातील शासकीय कार्यालये चकाकतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कार्यालयांची कार्यसंस्कृती वाढविण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांसाठी सुलभ व कर्मचाऱ्यांसाठी उत्साहवर्धक वातावरण निर्माण करा, असे आदेशच आता विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिले आहेत.
या अभियानाचा कार्यपद्धतीचा आढावा लवंगारे-वर्मा यांनी घेतला. ३० नोव्हेंबरपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. जुने सचिवालय इमारतीतील सर्व विभागप्रमुखांनी कार्यालयासह संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवावा, असे निर्देशही त्यांनी दिले. हे अभियान तीन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. त्यानुसार ३० नोव्हेंबरपर्यंत या अभियानातील निकषानुसार कार्यालय सुसज्ज व नेटके राहील याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. कार्यालयीन शिस्त तसेच कामाच्या वेळा पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी बजावले.
...
निवड मूल्यांकन पद्धतीने
या अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्यालयाची पुरस्कारासाठी मूल्यांकन पद्धतीने निवड होणार आहे. कार्यालय प्रमुखांनी तीन टप्प्यांत काम करणे आवश्यक असून यामध्ये कार्यालयाची स्वच्छता, कार्यपद्धती व सुलभीकरण, कर्मचारी लाभविषयक प्रकरणे व इतर बाबी, अभिलेख्यांची वर्गवारीनुसार विभागणी तसेच अनावश्यक साहित्याचे निर्लेखीकरण यावर विशेष कार्य करावे लागणार आहे.
...