सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 11:39 PM2021-04-08T23:39:08+5:302021-04-08T23:40:25+5:30
culpable homicide charged against government राज्य शासनाच्या निर्देशानुसार मनपा प्रशासनाने लावलेल्या कडक निर्बंधांचा भारतीय जनता पक्षातर्फे विरोध करण्यात आला. कोरोनाची मोठी लाट येऊ शकते, याचा अंदाज असतानादेखील शासनाने त्यासाठी काहीच नियोजन व तयारी केली नाही. त्यामुळे लोकांचा जीव जातो आहे. या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार मनपा प्रशासनाने लावलेल्या कडक निर्बंधांचा भारतीय जनता पक्षातर्फे विरोध करण्यात आला. कोरोनाची मोठी लाट येऊ शकते, याचा अंदाज असतानादेखील शासनाने त्यासाठी काहीच नियोजन व तयारी केली नाही. त्यामुळे लोकांचा जीव जातो आहे. या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. जमावबंदी असतानादेखील भाजपचे पाचहून अधिक नेते संविधान चौकात एकत्र आले. त्यांनी तोंडाला काळे मास्क व हातात फलक घेऊन आंदोलन केले.
यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, ग्रामीण अध्यक्ष अरविंद गजभिये प्रामुख्याने उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांची संख्या दहाच्या आतच होती व त्यांनी हातात काळे फलक घेऊन शासनाचा विरोध केला. सरकारने ‘मिनी लॉकडाऊन’च्या नावाखाली संपूर्ण ‘लॉकडाऊन’च लावले आहे. यामुळे जनतेची आर्थिक कोंडी झाली असून त्वरित हे कडक निर्बंध काही प्रमाणात हटवून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.