शासनाने दुकाने रात्री ८ पर्यंत सुरू ठेवावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:08 AM2021-07-16T04:08:11+5:302021-07-16T04:08:11+5:30
नागपूर : कोरोना लॉकडाऊननंतर लेव्हल-३ च्या निर्बंधामुळे नागपुरातील व्यवसायावर विपरीत परिणाम झाल्याने नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे (एनसीसीएल) अध्यक्ष ...
नागपूर : कोरोना लॉकडाऊननंतर लेव्हल-३ च्या निर्बंधामुळे नागपुरातील व्यवसायावर विपरीत परिणाम झाल्याने नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे (एनसीसीएल) अध्यक्ष विष्णू पचेरीवाला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दुकाने रात्री ८ पर्यंत सुरू ठेवण्याचा प्रस्ताव पाठविला आहे.
महाराष्ट्रात कोरोनामुळे व्यवसाय मंदीत आला आहे. अन्य राज्याच्या तुलनेत नागपुरात संक्रमण कमी झाले आहे. व्यवसाय दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. पण या वेळेच्या निर्बंधामुळे नोकरदारांना असुविधा होत आहे. नोकरदार सकाळी कामावर जात असल्याने त्यांना खरेदी करणे शक्य नसते. यामुळे व्यापाऱ्यांचा व्यवसाय बुडत आहे. याच कारणाने दुकाने रात्री ८ पर्यंत सुरू ठेवावीत. नोकरदारांसाठी शनिवार व रविवार आरामाचे दिवस असतात. त्यावेळी ते घरची कामे करतात. त्यांना निवांत खरेदीसाठी शनिवार व रविवारी मार्केट आणि सलून व स्पा दुकाने सुरू ठेवावी. मंदिर पूर्णपणे बंद आहेत, पण निश्चित निर्देशांतर्गत सकाळी आणि सायंकाळी दोन-दोन तासांसाठी सुरू ठेवण्याचा प्रस्ताव चेंबरने मुख्यमंत्र्यांकडे पाठविला आहे.