दिव्यांग मतदारांसाठी सरकारी वाहनांची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 01:33 PM2019-03-18T13:33:51+5:302019-03-18T13:35:45+5:30

लोकसभा निवडणुकीत दिव्यांगांचे मतदान १०० टक्के व्हावे, या उद्देशाने निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी विशेष सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत.

Government vehicles for Divyang | दिव्यांग मतदारांसाठी सरकारी वाहनांची व्यवस्था

दिव्यांग मतदारांसाठी सरकारी वाहनांची व्यवस्था

Next
ठळक मुद्देनिवडणूक आयोगातर्फे उपाययोजनांचे निर्देश रॅम्प, व्हीलचेअरसह असेल सुविधा

आनंद डेकाटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीत दिव्यांगांचे मतदान १०० टक्के व्हावे, या उद्देशाने निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी विशेष सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. इतकेच नव्हे तर दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी आणि घरी पोहोचविण्यासाठी शासकीय वाहनाची व्यवस्थाही प्रत्येक मतदान केंद्रांवर राहील, हे विशेष.
नागपूर जिल्ह्यात एकूण सात हजार दिव्यांग मतदार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. परंतु हा आकडा कितीतरी मोठा आहे. त्यामुळे दिव्यांग मतदार निश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे प्रयत्न केले जात आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण ४,३८२ मतदान केंद्रे आहेत. मतदानाची टककेवारी वाढावी म्हणून निवडणूक आयोग मतदार जनजागृत अभियान राबवीत असते. आता अंध, अस्थिव्यंग, कर्णबधिर इत्यादी दिव्यांग मतदारांचेही १०० टक्के मतदान व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाने विशेष सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले आहे. जसे प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प व व्हीलचेअरची सुविधा असेल. गेल्या वर्षी ही सुविधा काही मतदान केंद्रांवर होती. परंतु यंदा ती प्रत्येक ठिकाणी राहावी, असा प्रयत्न आहे. यासोबतच दिव्यांग व्यक्तींना मतदान करण्यासाठी त्यांना त्यांच्या घरून मतदान केंद्रावर आणण्यासाठी शासकीय वाहनही उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित मतदान केंद्रातील अधिकाऱ्याकडे तशी मागणी करावी लागेल. प्रत्येक मतदान केंद्रात शासकीय वाहन असते. ते दिवसभर केंद्रावरच असते. त्या वाहनाचाच वापर केला जाईल. मागणी केली असता शासकीय कर्मचारी स्वत: वाहन घेऊन संबंधित दिव्यांग मतदाराच्या घरी जातील आणि त्याला मतदान केंद्रावर घेऊन येतील. तसेच मतदान झाल्यावर त्याला घरी पोहोचवून देतील.

विशेष कमिटी स्थापन
दिव्यांगांचे मतदान वाढविण्यासाठी विशेष कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीमध्ये शासकीय अधिकाऱ्यासह दिव्यांगांसाठी काम करणाºया विविध सदस्यांचा समावेश आहे. ही कमिटी दिव्यांगांमध्ये मतदानासाठी जागृती करण्याचे काम करेल. यासाठी नागपूर शहराच्या मध्यभागी लवकरच दिव्यांगांसाठी एक मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

खास दिव्यांगांसाठी अ‍ॅप
निवडणूक आयोगाने खास दिव्यांगांसाठी पीडब्ल्यूडी (पर्सन विथ डिसअ‍ॅबिलिटी) अ‍ॅप तयार केले आहे. य अ‍ॅपद्वारे अपंग व्यक्तीने त्याचा इपीक नंबर (मतदान ओळखपत्र क्रमांक) टाकला तर त्याची थेट अपंग मतदार म्हणून नोंदणी होईल. अशाप्रकारे अपंग मतदार निश्चित झाल्यास प्रत्येक मतदान केंद्रात अपंगांसाठी व्हीलचेअर, रॅम्प आणि वाहनासह इतर सुविधा उपलब्ध करण्यास सोपे जाणार आहे.

Web Title: Government vehicles for Divyang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार