कोरपन्यातील शासकीय वाहने भंगारात
By admin | Published: May 5, 2014 12:33 AM2014-05-05T00:33:53+5:302014-05-05T00:33:53+5:30
आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त, अतिदुर्गम व मागासलेला तालुका म्हणून कोरपन्याची ओळख आहे. येथे विविध शासकीय कार्यालये आहेत.
वनसडी : आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त, अतिदुर्गम व मागासलेला तालुका म्हणून कोरपन्याची ओळख आहे. येथे विविध शासकीय कार्यालये आहेत. मात्र प्रशासनाच्या उदासिनतेमुळे येथील शासकीय वाहने व इतर सामग्री लिलावाअभावी भंगारात सडत आहे. येथील तहसिल कार्यालयाची दोन वाहने व अन्न पुरवठा विभागाचे एक वाहन नादुरुस्त स्थितीत बंद अवस्थेत उभे आहे. या वाहनाच्या बदल्यात दुसरी वाहनेदेखील कार्यालयाला मिळाली. परंतु या ठिकाणच्या जुन्या वाहनांची व सामग्रीची अनेक वर्षे लोटूनसुद्धा विल्हेवाट लावण्यात आली नाही. त्यामुळे शासनाची लाखो रुपयाच्या संपत्तीचे नुकसान होत आहे. दिवसेंदिवस वाहने व सामग्रीच्या किंमतीतही घट होत आहे. वाहने बेदखल असल्याने या वाहनांचे अनेक सुटे भाग चोरट्यानी लंपास केले आहेत. या सामग्रीचा लिलाव होणे आवश्यक असताना त्या तशाच खितपत पडून असल्याने शासनाला संपत्तीला विक्रीनंतर त्याला अपेक्षित असा भाव येण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे सामग्रीचा त्वरित लिलाव करून शासनाच्या संपत्तीचा होणारा ºहास थांबवावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)