राज्य शासनाची होती परवानगी
By admin | Published: October 21, 2015 03:17 AM2015-10-21T03:17:14+5:302015-10-21T03:17:14+5:30
राज्य शासनाने १९९७ मध्ये विक्रीकर विभागातून लिपीक कम् टायपिस्टचे पद समाप्त केले.
विक्रीकर विभागातून हटविले ११० कंत्राटी कर्मचारी\
नागपूर : राज्य शासनाने १९९७ मध्ये विक्रीकर विभागातून लिपीक कम् टायपिस्टचे पद समाप्त केले. याऐवजी विक्रीकर सहायक हे पद निर्माण करण्यात आले. या पदावर नियुक्तीची जबाबदारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे देण्यात आली. यासाठी आयोगाने परीक्षादेखील घेतली. परंतु अद्यापपर्यंत नियुक्ती झालेली नाही. दरम्यान, पद समाप्त झाल्यामुळे विक्रीकर विभाग कार्यालयाच्या नियमित कामावर प्रभाव पडत होता. त्यामुळे पूर्णकालीन नियुक्त्या होईपर्यंत राज्य शासनाने अस्थायी स्वरूपात कंत्राटी पद्धतीच्या आधारावर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला मंजुरी प्रदान केली. २०१२-१३ पासून ते २०१४-१५ पर्यंत विविध एजन्सीच्या मार्फत कर्मचाऱ्यांची कंत्राटदार पद्धतीने नियुक्ती करण्यात आली.
यावेळी चेन्नई येथील पेरी सॉफ्टवेअर सोल्युशन्स या कंपनीला ही जबाबदारी देण्यात आली आहे. याअगोदर महात्मा फुले मल्टीसर्व्हिसेस आणि वंश इन्फोटेक यांच्याकडे ही जबाबदारी होती. २०१४ मध्ये विक्रीकर विभागात अस्थायी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी एक नियमावली तयार करण्यात आली. याअंतर्गत अस्थायी पदांसाठी पात्रतादेखील निश्चित करण्यात आली. (प्रतिनिधी)