मुख्यमंत्री समाधान शिबिरामुळे शासन जनतेपर्यंत पोहोचणार

By admin | Published: August 10, 2016 02:21 AM2016-08-10T02:21:38+5:302016-08-10T02:21:38+5:30

शहरातील झोननिहाय मुख्यमंत्री समाधान शिबिराला मंगळवारी सुरुवात झाली आहे. शहरातील जनतेने आपल्या समस्या सोडविण्यासाठी

Government will reach out to the people due to the Chief Minister's Meetings Camp | मुख्यमंत्री समाधान शिबिरामुळे शासन जनतेपर्यंत पोहोचणार

मुख्यमंत्री समाधान शिबिरामुळे शासन जनतेपर्यंत पोहोचणार

Next

चंद्रशेखर बावनकुळे : समाधान शिबिराला लक्ष्मीनगरपासून सुरुवात
नागपूर : शहरातील झोननिहाय मुख्यमंत्री समाधान शिबिराला मंगळवारी सुरुवात झाली आहे. शहरातील जनतेने आपल्या समस्या सोडविण्यासाठी या शिबिरांचा लाभ घ्यावा. शिबिरामध्ये शासनाचे सर्व विभाग एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे जनतेच्या समस्या त्वरित सुटण्यास मदत होणार असून शासन जनतेपर्यंत पोहोचणार असल्याचा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार शहरातील सर्व झोनमध्ये मुख्यमंत्री समाधान शिबिर, आपले शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. लक्ष्मीनगर झोनमधील विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या परिसरात आयोजित शिबिराचे मंगळवारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी आशा पठाण, महापालिकेच्या जलप्रदाय समितीचे सभापती संदीप जोशी, शिक्षण सभापती गोपाल बोहरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकरे, प्रा. राजीव हडप, भाजपच्या दक्षिण पश्चिम मंडळाचे अध्यक्ष प्रकाश भोयर , नगरसेविका नीलिमा बावणे, उषा निशितकर, जयश्री वाडीभस्मे, सचिन कारळकर, आशिष पाठक, श्रीपाद बोरीकर, विमलकुमार श्रीवास्तव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. १२ आॅगस्टपर्यंत हे शिबिर नागरिकांसाठी सुरू राहणार आहे.
या शिबिरात शासकीय दरामध्ये शपथपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, सर्व प्रकारचे जातीचे प्रमाणपत्र, वय, अधिवास, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, मतदार यादीतील नावाची दुरुस्ती करणे, नाव वगळणे, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजना, श्रावणबाळ योजना, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, नवीन शिधापत्रिका, विवाह प्रमाणपत्र, जन्म -मृत्यू प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण नोंद, प्रमाणपत्र, वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना, आधार कार्ड बनविणे, आधार कार्ड सुधारणा, आधार कार्डचे स्मार्ट कार्ड, पॅन कार्ड महापालिकेसंबंधी असलेल्या समस्यांचे समाधान या शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या शिबिरात विविध योजनांचा लाभ एका छताखाली जलद गतीने मिळणार आहे. योजनेस आवश्यक असलेली कागदपत्रे आवश्यकतेनुसार या शिबिरातून नागरिकांनी प्राप्त करावी. या तीन दिवसांच्या शिबिरात लक्ष्मीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभाग ५५-आरपीटीएस, प्रभाग ५६-साई मंदिर, प्रभाग ६८- नरेंद्रनगर, प्रभाग ६९-खामला, प्रभाग ७०- गोपालनगर, प्रभाग ७१- टाकळी सिम, प्रभाग ७२- जयताळा या प्रभागातील नागरिकांना लाभ घेता येईल.(प्रतिनिधी)

Web Title: Government will reach out to the people due to the Chief Minister's Meetings Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.