राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आजपासून तीन दिवस विदर्भात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 07:10 AM2021-11-23T07:10:00+5:302021-11-23T07:10:02+5:30
Nagpur News राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत.
नागपूर : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. २३ नोव्हेंबरला दुपारी ४.१५ वाजता नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपालांचे आगमन होईल. मंगळवारी ते राजभवन येथे मुक्काम करतील.
२४ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता राज्यपाल कोश्यारी हे अमरावतीकडे शासकीय वाहनाने प्रयाण करतील. अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर राज्यपाल नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगाव पापळला भेट देतील. त्यानंतर पापळ येथून यवतमाळकडे प्रयाण करतील. यवतमाळ जिल्ह्यातील निलोना येथील दीनदयाल प्रबोधिनीला राज्यपाल भेट देतील व यवतमाळ येथे मुक्काम करतील.
२५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ यवतमाळ येथील गोधनी रोडवरील प्रयास वन येथे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते वृक्षारोपण होईल तसेच स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रेरणास्थळी आयोजित प्रार्थना व वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर इंग्रजी माध्यम शाळेच्या नव्या इमारतीचे लोकार्पण व आरोग्य शिबिराचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते होईल. दुपारी पावणे तीन वाजता राज्यपालांचे यवतमाळ येथून नागपूर विमानतळावर आगमन होईल. दुपारी तीनला मुंबईकडे प्रयाण करतील.