राज्यपाल कोश्यारी यांची विजय दर्डा यांच्याशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 12:47 AM2020-07-26T00:47:02+5:302020-07-26T00:48:33+5:30
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शनिवारी लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्या नागपुरातील ‘यवतमाळ हाऊस’ या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शनिवारी लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्या नागपुरातील ‘यवतमाळ हाऊस’ या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. ते येथे जवळपास ९० मिनिटे थांबले. यावेळी राज्यपाल कोश्यारी आणि विजय दर्डा यांच्यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. दोघांनीही राज्यसभेतील दिवसांच्या जुन्या आठवणीही ताज्या केल्या.
राज्यपाल आज सेवाग्राममध्ये
राज्यपाल कोश्यारी रविवारी दुपारी १२ वाजता सेवाग्रामला पोहोचतील. आपल्या या दौºयात ते पवनार येथील विनोबा आश्रमालाही भेट देतील. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी ते नागपुरातील दीक्षाभूमीलाही भेट देतील.