राज्यपालांनी केला पोलीस उपायुक्त परदेशींचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 09:19 PM2018-03-29T21:19:15+5:302018-03-29T21:19:25+5:30

पोलीस दलात ठिकठिकाणी उल्लेखनीय कामगिरी बजावणारे पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांचा राज्यपाल के. विद्यासागर राव यांच्या हस्ते मानाचे पोलीस पदक देऊन गौरव करण्यात आला. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील १३७ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बुधवारी मुंबईत एका शानदार कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. त्यात नागपुरातून परदेशी यांचा सहभाग होता.

The Governor made the honor of Police Deputy Commissioner Pardeshi | राज्यपालांनी केला पोलीस उपायुक्त परदेशींचा गौरव

राज्यपालांनी केला पोलीस उपायुक्त परदेशींचा गौरव

googlenewsNext
ठळक मुद्देमानाचे पोलीस पदक : मुंबईत झाला सत्कार समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस दलात ठिकठिकाणी उल्लेखनीय कामगिरी बजावणारे पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांचा राज्यपाल के. विद्यासागर राव यांच्या हस्ते मानाचे पोलीस पदक देऊन गौरव करण्यात आला. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील १३७ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बुधवारी मुंबईत एका शानदार कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. त्यात नागपुरातून परदेशी यांचा सहभाग होता.
पोलीस दलात १९९३ ला उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. पहिली नियुक्ती त्यांना नागपूरच्या सोनेगाव ठाण्यात मिळाली होती. या ठाण्याच्या हद्दीत झालेल्या १० वर्षीय मुलाच्या खुनाचा तपास करताना त्यांनी भक्कम पुरावे गोळा केले. त्यामुळे न्यायालयाने आरोपींना जन्मठेप सुनावली. सन २००० मध्ये नाशिक येथे कार्यरत असताना त्यांनी अत्यंत कौशल्याने जातीय दंगल हाताळली. त्यानंतर घरफोडी करणाºया एका आंतरदेशीय टोळीला जेरबंद केले. २००३ ते २००७ या कालावधीत ते चंद्रपूर-गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात सेवारत होते. त्यांनी विविध ठिकाणी योजनाबद्धरीतीने नक्षल्यांच्या तळांवर छापेमारी करून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला. जनजागृती करून ४६ नक्षल्यांना शरण येण्यास भाग पाडले. २००७ ते २०१० या कालावधीत पुणे ग्रामीणमध्ये कार्यरत असताना एका अंध महिलेवर समाजकंटकांनी सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणात आरोपींचा कसलाही धागादोरा नसताना त्यांनी शिताफीने तपास करून आरोपींना अटक केली. या प्रकरणात आरोपींनी १० वर्षांची शिक्षा झाली होती. थेऊर येथे सुरू असलेल्या दारू पार्टीवर त्यांनी घातलेली धाड आणि ४५० मद्यधुंद तरुणांचे प्रकरणही चांगलेच गाजले होते. त्यांनी उस्मानाबाद पुणे येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त, मुंबईत एसआरपीएफला समादेशक म्हणूनही चांगली कामगिरी बजावली. नागपुरात परिमंडळ २ आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त म्हणूनही त्यांची कामगिरी उत्तम राहिली. हे सर्व लक्षात घेता, उपायुक्त परदेशी यांचा राज्यपालांच्या हस्ते बुधवारी गौरव करण्यात आला.
आयुक्त, सहआयुक्तांकडून अभिनंदन!
२५ वर्षांपूर्वी नागपुरात पोलीस उपनिरीक्षक म्हणून आणि आता पोलीस उपायुक्त म्हणून सेवारत असलेल्या परदेशी यांना मानाचे पदक तसेच गौरव प्राप्त झाल्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परदेशी यांचे अभिनंदन केले.

Web Title: The Governor made the honor of Police Deputy Commissioner Pardeshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.