राज्यपाल रमेश बैस यांनी केली 'वंदे भारत'ची सफर
By नरेश डोंगरे | Published: August 4, 2023 01:59 PM2023-08-04T13:59:29+5:302023-08-04T14:09:43+5:30
राज्यपालांचे नागपूर स्थानकावर आगमन होणार असल्याचे कळाल्यामुळे रेल्वे पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे स्थानकाच्या आत बाहेर तगडा बंदोबस्त लावला होता
नरेश डोंगरे
नागपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी वंदे भारत ट्रेनची सफर करत आज नागपूर गाठले. दुपारी १२.१५ वाजता ते नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचले. येथे स्वागताची औपचारिकता स्विकारल्यानंतर ते राजभवनकडे निघाले.
नागपुरात आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे विविध कार्यक्रम आहे. त्यानिमित्ताने राज्यपाल बैस नागपूरला पोहचण्यासाठी शुक्रवारी सकाळी रायपूर (छत्तीसगड) येथून बिलासपूर - नागपूर वंदे भारत ट्रेन मध्ये बसले. दुपारी १२.१५ वाजता वंदे भारत नागपूर स्थानकावर पोहचली. गाडीतून खाली उतरताच विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,पोलीस आयुक्त अमितेशकुमार, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे,पोलीस अधीक्षक विशाल आनंद, रेल्वेचे पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. रेल्वे स्थानकावर अधिकाऱ्यांशी धावती चर्चा केल्यानंतर १० मिनिटांनी राज्यपाल राजभवनकडे निघाले.
दरम्यान, राज्यपालांचे नागपूर स्थानकावर आगमन होणार असल्याचे कळाल्यामुळे रेल्वे पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे स्थानकाच्या आत बाहेर तगडा बंदोबस्त लावला होता. श्वान पथकाच्या मदतीने बॉम्ब शोधक तसेच नाशक पथकाने (बीडीडीएस) रेल्वे स्थानकाचा कानाकोपरा आधीच तपासून घेतला होता. प्रत्येक फलाटावर सकाळपासूनच सशस्त्र पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.