राज्यपाल म्हणाले, संघस्थानावरून आल्याचा अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 08:53 PM2019-02-05T20:53:24+5:302019-02-05T20:58:53+5:30

साधारणत: राज्यपालपद हे धर्म, पंथ, भाषा, पक्ष, संघटना, राजकारण यांच्या चौकटीत बसत नाही. राज्यपालपदावर बसल्यानंतर कुणाचीही बाजू न घेता निष्पक्षपणे भूमिका मांडावी लागते. मात्र राज्याचे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर स्तुतिसुमने वाहिली. संघस्थानावरून आल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे प्रतिपादन केले. रामटेक येथील त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत.

The Governor said, the pride of returned from the Sangh place | राज्यपाल म्हणाले, संघस्थानावरून आल्याचा अभिमान

राज्यपाल म्हणाले, संघस्थानावरून आल्याचा अभिमान

Next
ठळक मुद्देसंघाबाबत अनेक गैरसमज : सर्वसमावेशक संघटना असल्याचे उद्गार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साधारणत: राज्यपालपद हे धर्म, पंथ, भाषा, पक्ष, संघटना, राजकारण यांच्या चौकटीत बसत नाही. राज्यपालपदावर बसल्यानंतर कुणाचीही बाजू न घेता निष्पक्षपणे भूमिका मांडावी लागते. मात्र राज्याचे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर स्तुतिसुमने वाहिली. संघस्थानावरून आल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे प्रतिपादन केले. रामटेक येथील त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत.
आपल्या भाषणादरम्यान लालकृष्ण अडवाणींच्या एका पुस्तकाचा दाखला देत असताना ते बोलत होते. संघस्थानावरून आपण आलो आहोत व ते आपण अभिमानाने सांगतो. २१ व्या वर्षी प्रचारक असताना अडवाणींना संघावर लादलेली बंदी व संघावर टीका होत असतानादेखील स्पष्टीकरण न दिले जाणे याबाबत प्रश्न पडले होते. याबाबत त्यांनी गोळवलकर गुरुजी यांनाच विचारणा केली होती. संघाचे लिखीत संविधान सरकारने मागितले तर ते त्यांना देण्यात येईल. तसेच धर्मनिरपेक्षता काय आहे हे सरकारला समजायला हवे असे उत्तर देत गोळवलकरांनी अशोकचक्राचे उदाहरण दिले होते. असे अनेक प्रश्न संघस्थानी विचारले जातात व प्रत्येकाच्या मनातील शंकांचे योग्य समाधान केले जाते. १९२५ पासून ही प्रक्रिया सुरू आहे. संघावर टीका होत असते व ती होतच असेल. मात्र आतापर्यंतचा प्रवास पाहता डॉ.हेडगेवार यांनी मांडलेले तत्त्वज्ञान मजबूत होते हे दिसून येते, असे राज्यपाल म्हणाले.
सोबतच संघाने व्यक्तीचे मत तसेच पूजाअर्चना, धर्माच्या अधिकारांचा नेहमीच आदर केला आहे. संघातून अनेक समाजप्रबोधन करणारे लोक घडले. याशिवाय समाजातील सर्वच समाजप्रबोधकांचा संघात सन्मान करण्यात येतो व आठवणदेखील करण्यात येते. संघ सर्वसमावेशक आहे हे सांगत राज्यपालांनी मुंबईतील मल्याळी समाजाचे उदाहरण दिले. नारायण गुरुजींच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाला समाजातील पदाधिकाऱ्यांनी मला बोलविले. त्यांना वाटले की गुरुजींबाबत फारशी कुणाला माहिती नाही. मात्र संघात नारायण गुरुजींचे प्रात:स्मरण करण्यात येते. संघाबाबत लोकांचा असलेला असा गैरसमज दूर व्हायला हवा, असेदेखील राज्यपाल म्हणाले.
शिक्षणप्रणालीत भारतीयत्वावर भर हवा
देश एकेकाळी विश्वगुरू होता. आपले जुने वैभव परत मिळवायचे असेल तर भारतीयत्वावर भर असलेल्या शिक्षणप्रणालीची आवश्यकता आहे. शिक्षणप्रणालीत आधुनिकता, उद्यमशीलतेच्या भावनेलादेखील प्रोत्साहन दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपालांनी केले.

Web Title: The Governor said, the pride of returned from the Sangh place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.