सरकार ड्रग्स माफियांच्या पाठीशी, विरोधकांचा आरोप, विधानभवन परिसरात आंदोलन
By मंगेश व्यवहारे | Published: December 18, 2023 11:44 AM2023-12-18T11:44:38+5:302023-12-18T11:44:38+5:30
राज्य सरकार ड्रग्स माफियानां पाठीशी घालत आहे. सरकारमधील काही मंत्री यामध्ये सहभागी आहेत, असा आरोप विरोधकांनी सोमवारी लावला.
नागपूर : राज्य सरकार ड्रग्स माफियानां पाठीशी घालत आहे. सरकारमधील काही मंत्री यामध्ये सहभागी आहेत, असा आरोप विरोधकांनी सोमवारी लावला. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवन परिसरात आंदोलन केले.
‘उडता पंजाबनंतर उडता महाराष्ट्र’, ‘सरकारकडून काय करावी आशा, तरुणांच्या माथी मारली ड्रग्सची नशा’, असे फलक हातात घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारला धारेवर धरले. यावेळी ‘ड्रग्स माफियांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा निषेध असो’, ‘उडता महाराष्ट्र करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा देण्यात आल्या.
याबाबत अधिक सांगताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले,‘शेजारी असलेल्या गुजरातमधून दोन हेलिकॉप्टर येतात. त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात ड्रग्स माफिया कार्यरत आहेत. त्यांना सरकार पाठीशी घालत आहे. महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेश सरकारमधील काही मंत्री या माफियांना संरक्षण देताहेत. ललित पाटील या संपूर्ण प्रकरणातील छोटासा प्यादा आहे. वास्वतिक पाहता हे सरकार यासाठी जबाबदार असून त्यांच्याद्वारे ड्रग्स माफिया सक्रिय आहेत.’ यावेळी आंदोलनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह वर्षा गायकवाड पाटील, रवींद्र धंगेकर, सतेज पाटील आदींची उपस्थिती होती.